अकोला : भारतात श्रीरामाची पूजा होणे आणि त्याचा शत्रू म्हणून खलनायकत्व मिळालेल्या रावणाची हेटाळणी होणे, ही सर्वसामान्य बाब आहे; परंतु, ‘एका ठिकाणी रावणाची पूजा होते, तीही सद्गुणांमुळे’ हे सांगितले तर खरे वाटणार नाही. मात्र, हे सत्य असून, अकोला जिल्ह्यातील सांगोळा नावाच्या गावी रावणाची सद्गुणांमुळे पूजा केली जाते. या प्रथेला तब्बल २१० वर्षांची प्राचीन परंपरा लाभली आहे.

वाईट ते सोडावे आणि चांगले ते घ्यावे, अशी शिकवण आपल्या संस्कृतीने दिली. दशानन रावणात अनेक दुर्गुण होते, पण काही चांगले गुणही होते. याच गुणांमुळे अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात रावण दहनऐवजी पूजा केली जाते. बाळापूर तालुक्यातील वाडेगावनजीक हे गाव आहे. गावाच्या पूर्वेस एका ओट्यावर रावणाची पुरातन मूर्ती आहे. उघड्यावर ही मूर्ती वसलेली आहे. हे मंदिर या गावाचे वैशिष्ट्य तसेच श्रद्धस्थानही आहे. रावण या गावाचे दैवत असून ही मूर्ती स्थापन केल्यापासून गावावरील संकटे दूर झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
white house
३,००० कामगार, ४१२ दरवाजे, १३२ खोल्या अन् बरंच काही; जाणून घ्या ट्रम्प यांच्या होणाऱ्या अधिकृत निवासस्थानाची वैशिष्ट्यं
Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

हेही वाचा : नागपूर : धान कापणीला गेलेल्या महिलेवर हल्ला करणारी वाघिण जेरबंद

रावण स्वभावाने कपटी, अहंकारी होता, असे मानल्या जाते. अमर्याद लालसा आणि अर्निवचनीय महत्त्वाकांक्षा या अवगुणांमुळे त्याच्यात असुरी वृत्ती होती. रावणातील हे दुर्गुण बाजूला सारले तर त्याच्यातील गुणांचे दर्शन होते. तपस्वी, बुद्धीमान, शक्तिशाली, वेदाभ्यासी आदी गुणांमुळेच सांगोळ्यात रावणाची पूजा केली जाते. २१० वर्षांपूर्वी या भागात वास्तव्य असणाऱ्या एका ऋषीने गावाच्या पश्चिमेला असलेल्या जंगलात तपश्चर्या केली होती. त्यांच्याच प्रेरणेने गावात अनेक धार्मिक उपक्रमही होत होते. आजही त्यातील काही उपक्रम सुरू आहेत. ऋषी ब्रह्मलीन झाल्यानंतर एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती बनवण्याचे काम सोपवण्यात आले. पण त्याच्या हातून दशानन रावणाची मूर्ती घडली.

हेही वाचा : “आरक्षणासंदर्भात घाईत निर्णय घेता येत नाही”, मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया

दहा तोंडे, काचा बसवलेले २० डोळे, सर्व आयुधे असलेले २० हात, अशी विराट मूर्ती या मूर्तिकाराने घडवली. दहा फाटे असलेले सिंदीचे झाड आणि अवचित घडलेली ही लंकेश्वराची मूर्ती, हा योगायोग श्रद्धाळू ग्रामस्थांनी हेरला आणि गावात लंकेश्वर स्थिरावले. भक्तिभावाने रावणाची पूजा केली जाते. दसऱ्यानिमित्त सर्वत्र रावणाचे दहन होत असतांना या गावात मात्र विशेष पुजा होते. गावात रावणाचे भव्य मंदिर बांधले जावे, अशी आता ग्रामस्थांची इच्छा आहे.

हेही वाचा : चक्रीवादळ महाराष्ट्राच्या नाही, तर ओमानच्या दिशेने; ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत अवकाळी पावसाची शक्यता नाही

राज्यातील एकमेव स्थळ

अकोला जिल्ह्यातील सांगोळा येथे सद्गुणांमुळे रावणाची पूजा करण्यात येते. या प्रकारचे राज्यातील एकमेव धार्मिक स्थळ असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विदर्भातील काही आदिवासी भागात देखील रावणाला पूजले जाते.