अकोला : ‘आयआरसीटीसी’ने ‘व्रत का खाना’ नावाची खास नवरात्री थाळी जाहीर केली आहे. शारदीय नवरात्रीचा उत्सव १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. याआधी उपवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने खास भेट दिली आहे. रेल्वे कंपनी ‘आयआरसीटीसी’ने खास नवरात्री थाळीची घोषणा केली आहे. त्याला ‘व्रत का खाना’ असे नाव देण्यात आले आहे. हा त्यांच्या ई-केटरिंग मेनूचा भाग असेल. आता भाविकांना टेन्शन फ्री राहता ट्रेनने प्रवास करता येणार आहे. याशिवाय, ‘आयआरसीटीसी’ ने आपला मेनू देखील जारी केला आहे. ही नवरात्री थाली १२ ऑक्टोबरपासून एकूण ९६ स्थानकांवर उपलब्ध झाली. यात आणखी वाढ होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : वीज दुरुस्तीसाठी खांबावर चढला आणि क्षणात कोळसा झाला, नेर येथील घटनेने खळबळ

‘आयआरसीटीसी’कडून सांगितल्यानुसार, फास्ट प्लेटमध्ये सात्विक आहार असेल. मेनूबद्दल सांगायचे तर, या थाळीमध्ये साबुदाणा आहार जसे की, साबुदाणा खिचडी, सुका मखना, साबुदाणा नमकीन, बटाट्याची टिक्की, नवरात्री थाळी, जिरे आलू, फ्रेंच फ्राईज, साबुदाणा वडा, फलाहारी चुडा, फलाहारी थाळी, मलाई बर्फी, रसमलाई, मिल्क केक, साधी बर्फी, लस्सी, साधे दही इ. यांचा समावेश आहे. नवरात्री थाळी जवळपास ९६ स्थानकांवर उपलब्ध असेल. या स्थानकांमध्ये नवी दिल्ली, कानपूर सेंट्रल, जबलपूर, रतलाम, जयपूर, पाटणा, राजेंद्र नगर, अंबाला कॅंट, झाशी, औरंगाबाद, अकोला, इटारसी, वसई रोड, नाशिक रोड, जबलपूर, सुरत, कल्याण, बोरेवली, दुर्ग, ग्वाल्हेर, मथुरा, नागपूर, भोपाळ आणि अहमदनगर इत्यादींचा समावेश आहे. ‘आयआरसीटीसी’ च्या ई-केटरिंग वेबसाइट http://www.eCatering.irctc.co.in वर प्री-ऑर्डर करून प्रवासी या सेवांचा लाभ घेऊ शकतात.

मराठीतील सर्व लोक उत्सव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola irctc started vrat ka khana a special food service for passengers during navratri festival ppd 88 css
Show comments