चंद्रपूर : आराध्य दैवत महाकाली मंदिरात १५ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. जिल्ह्यासह मराठवाडा, सोलापूर, विदर्भ व आंध्रप्रदेशातील भाविक महाकालीच्या दर्शनासाठी दाखल होणार आहेत. नवरात्रोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी होत असल्याने मंदिर परिसरातच भक्त निवासात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी, अंघोळ, शौचालय, सार्वजनिक रुग्णालय, आदींचीही व्यवस्था आहे. मंदिराला लागून असलेल्या पटांगणावर १८ हजार चौरस फूट, तर बैलबाजारात १० हजार चौरस फूट मंडप उभारण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ऊर्जा खात्यातील कंत्राटी कामगारांचा १ नोव्हेंबरला मोर्चा; सरकार मागण्यांची दखल घेत नसल्याचा आरोप

देवीचे दर्शनासाठी भक्तगणांच्या रांगेसाठी १८ हजार चौरस फुटाचा एक आणि दुसरा पाच हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे. १५ ऑक्टोबरला सकाळी पाच वाजता श्री महाकाली देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुनील नामदेवराव महाकाले यांचा हस्ते महाकाली मातेचा अभिषेक, शेंदूर लावून देविला वस्त्र व अलंकार साज करून महापुजा घटस्थापना करण्यात आल्यानंतर महाआरती करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व लोक उत्सव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur mahakali mata navratri festival started from today rsj 74 css
Show comments