नाशिक : कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गडावरील देवी सप्तश्रृंगीच्या नवरात्रोत्सवास रविवारपासून उत्साहात सुरुवात झाली. रविवारी सकाळी गडावर देवीच्या आभुषणांची पूजा संस्थानच्या कार्यालयात जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. व्ही. वाघ यांच्या हस्ते झाली. त्यानंतर दागिन्यांची पारंपरिक वाद्य वाजवत मिरवणूक काढण्यात आली.

सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. नवरात्रोत्सवानिमित्त गडावर यात्रोत्सव भरत असल्याने प्रशासनाकडून सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. १६ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत मंदिरात दररोज पंचामृत महापूजा, सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशी तीन वेळा महाआरती होणार आहे.

हेही वाचा : नाशिक जिल्हा बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी हालचाली; राज्य सहकारी बँकेला प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा प्रयत्न

२३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री गडाच्या शिखरावर कीर्ती ध्वज फडकविला जाईल. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपासून विविध ठिकाणांहून कावडधारकांनी आणलेले नद्यांचे पाणी जमा करण्यात येईल. रात्री देवीला जलाभिषेक करुन कोजागिरी उत्सव साजरा होईल. २९ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवाचा समारोप होईल. सप्तश्रृंग गड ग्रामपंचायत आणि विश्वस्त यांच्यासह जिल्हा प्रशासनातर्फे भाविकांच्या सुविधेसाठी गडावर व्यवस्था करण्यात आली आहे.

Story img Loader