How to Make Diya : सध्या सगळीकडे दिवाळीची जय्यत तयारी सुरू आहे. दिवाळीच्या फराळापासून घरसजावटीपर्यंत प्रत्येक जण मग्न आहे. अशात दिवाळीनिमित्त अनेक आकर्षक दिवे बाजारात आलेले आहेत. यंदा दिवाळीत आकर्षक दिव्यांनी जर तुम्हाला घर सजवायचे असेल तर महागडे दिवे विकत घेण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी सुंदर दिवे बनवू शकता.
सध्या सोशल मीडियावर घरच्या घरी आकर्षक दिवे कसे बनवायचे, या विषयी अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. घरच्या घरी जुगाड करुन आकर्षक दिवा कसा बनवायचा, असा एक सध्या व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये प्लास्टिक चमच्यांपासून आकर्षक दिवा कसा बनवायचा, हे दाखवले आहे.
हेही वाचा : पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करायची? हे तीन व्यायाम प्रकार जाणून घ्या, पाहा VIDEO
या व्हायरल व्हिडीओमध्ये १५- २० प्लास्टिक चमचे घेतलेले दिसत आहे.चमच्याच्या तोंडावर फेव्हीकॉल लावून त्यावर चकमक टाकलेली दिसत आहे. त्यानंतर सर्व प्लास्टिक चमच्याचे तोंड कापून घ्यावे. त्यानंतर एक जुनी डिव्हीडी घ्यावी. त्यावर गोंद ने हे चमच्याचे तुकडे व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे चिपकून घ्यावे आणि मध्यभागी दिवा लावावा. तुम्ही दिव्याला तुमचा आवडता रंग सु्द्धा देऊ शकता. चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही खालील व्हिडीओ पाहू शकता.
rbcreativeworld08 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.युजर्सनी ही हटके जुगाड आवडला आहे. एका युजरने लिहिलेय, “खूप छान” तर एका युजरने लिहिलेय, “जुन्या वस्तूंपासून खूप छान दिवा बनवलाय”