संतोष मासोळे

धुळे: खान्देशची कुलस्वामिनी आदिशक्ती श्री एकविरा देवी मंदिर हे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्रोत्सव आणि चैत्र महिन्यात होणाऱ्या यात्रेत लाखो भाविक दर्शनासाठी येतात. अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून दर्शनासाठी येणाऱ्या भविकांसाठी बांधलेली बारव (पाय विहीर) हे या मंदिराचे एक वैशिष्ट्ये म्हणावे लागेल.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
Should a divorced wife receive maintenance under any circumstances
घटस्फोटीत पत्नीला कोणत्याही परिस्थितीत निर्वाहनिधी मिळालाच पाहिजे का?
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
Public Works Minister Shivendra Raje, Satara Shivendra Raje,
साताऱ्यातील आम्ही चारही मंत्री एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास करू, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचा विश्वास

खान्देश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीचे देवपूर येथे पांझरा नदीच्या किनाऱ्यावर अतिशय प्राचीन असे देवस्थान आहे. पूर्वी हे मंदिर हेमाडपंथी होते. देवीची मूर्ती अष्टभूजा, शेंदूरलेपन पूर्वाभिमुख असून पद्मासनी बसलेली आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूस गणपती व डाव्या बाजूस तुकाई मातेची चतुर्भूज शेंदूर लेपनाची मूर्ती आहे. नंदादीप सतत तेवत राहावा म्हणून साडेचार फूट उंचीच्या दोन मोठ्या समया आहेत. देवीची मूर्ती पूर्वाभिमूख असल्यामुळे प्रभात समयी सूर्यनारायणाची किरणे देवीच्या चरणावर येतात.

आणखी वाचा-धुळे जिल्ह्यात तीन बनावट डॉक्टर जाळ्यात

प्राचीन मंदिराचा जीर्णोध्दार अहिल्याबाई होळकर यांनी केला. पाण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी पायविहीर (बारव) बांधली. देवीची यात्रा आणि नवरात्र उत्सवाप्रसंगी मंदिर आवारात भरपूर प्रकाश असावा, यासाठी भव्य दीपस्तंभ उभारला. इंग्रज सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे नंदादीपसाठी नस्त नेमणूक वार्षिक रुपये २९ देवस्थानास मिळत होते.

महाराष्ट्राबाहेर कर्नाटक राज्यातही एकविरा मातेचे स्थान असून तेथेही देवीची आराधना केली जाते. पूर्व, पश्चिम,दक्षिण आणि उत्तर देवालयाची जागा असून यात्रेच्या वेळी देवीचा तगतराव (रथ) फिरविण्यासाठी मंदिरासभोवती जागा ठेवली आहे. याशिवाय भाविकांच्या वाहनांसाठी वाहन तळाची सोय करण्यात आली आहे.

आणखी वाचा-नाशिक : सप्तशृंग गडावर भाविकांनी सहकार्य करावे – पोलिसांचे आवाहन

मंदिराचा सभा मंडप ३६ फूट बाय ४० फूट असून त्याची उंची १५ फूट आहे. हवा खेळती रहावी म्हणून मोठाले दरवाजे आणि खिडक्या ठेवण्यात आल्या आहेत. पूर्वेस मोठ्या दरवाजावर मधोमध गणपतीची स्थापना केली आहे. या दरवाजाच्या पुढे मोठा दगडी पुरातन कमानी दरवाजा असून त्यावर नगारखाना आहे. त्यानंतर मंदिराच्या पायऱ्या सुरू होतात. दोन्ही बाजूस मोठे ओटे आणि हत्तींच्या दोन भव्य प्रतिकृती आहेत. समोर घाट असून पांझरा नदीचे विस्तीर्ण पात्र आहे. मंदिर परिसरात शितला माता, खोकली माता, परशुराम, हनुमान, विठ्ठल रुक्मीणी, गजानन महाराज, साईबाबा, महादेव यांची मंदिरे असून या सर्व मंदिरांना स्वतंत्र कळस आहेत. या ठिकाणी शमीचा पुरातन वृक्ष असून त्या वृक्षाखाली कालभैरव, शमी देवीचे मंदिर आहे. पश्चिमेस महालक्ष्मीचे मंदिर असून चार खोल्यांची जुनी धर्मशाळा आहे. उत्तरेस सर्वसोयींयुक्त तीन खोल्या असून भाविकांना पिण्यासाठी थंड पाण्याची सोय व शूचिर्भूत होण्यासाठी जलकुंभ आहे. दक्षिणेस संस्थानचे कार्यालय आहे.

Story img Loader