Mahalakshami Rangoli Design Video: सध्या देशभरात नवरात्रोत्सवाचा आनंद व उत्साह पाहायला मिळत आहे. देवीच्या नऊ रूपांचे पूजन करून शारदीय नवरात्र दरवर्षी साजरी केली जाते. यंदा या उत्साहाला चार चांद लावण्यासाठी लोकसत्ता ऑनलाईन तर्फे ‘तू ही दुर्गा’ ही विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या अंतर्गत फोटो अपलोडसह रील स्पर्धा सुद्धा राबवण्यात आली आहे. यामधीलच एक अत्यंत सुंदर रील आज आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. मिताली मिलिंद सुर्वे या कलाकार महिलेने नवरात्रीत आपल्या कलाविष्काराने सोशल मीडियावर नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे. मिताली ही एक रांगोळी आर्टिस्ट आहे व नवरात्री निमित्त तिने कोल्हापूरच्या अंबाबाईची सुंदर रांगोळी रेखाटली आहे. लोकसत्ताच्या ‘तू ही दुर्गा’ उपक्रमात सहभाग घेत मितालीने या रांगोळीचा सुंदर व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे.

मितालीने रेखाटलेल्या रांगोळीतील बारकावे व खरेपणा पाहून देवीभक्त सुद्धा आनंदून गेले आहेत. विशेषतः ही रांगोळी रेखाटताना स्वतः मितालीने अगदी पारंपरिक साजशृंगार करून व्हिडीओ बनवला आहे ज्याचे सुद्धा प्रचंड कौतुक होत आहे. या व्हिडीओ बाबत एक थक्क करणारी बाब म्हणजे नऊ दिवसात पाळले जाणारे नऊ रंग मिताली आपल्या रांगोळीमधूनही दाखवत आहे. यानुसार हिरव्या रंगाच्या दिवशी तिने रेखाटलेली अप्रतिम रांगोळी पाहून आपणही घरबसल्या अंबाबाईचे दर्शन घ्या.

हे ही वाचा<< नथ जिंकण्यासाठी उरले शेवटचे तीन दिवस! फक्त पाच क्लिकमध्ये फोटो अपलोड करा व मिळवा आकर्षक बक्षीस

लोकसत्तासह व्हा ‘तू ही दुर्गा’!

तुम्हालाही जर का लोकसत्ताच्या पेजवर झळकण्याची इच्छा असेल तर त्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही तुमच्या नवरात्रीच्या सेलिब्रेशनचे रील बनवून लोकसत्ता लाईव्ह (@loksattaLive) या पेजला इन्स्टाग्रामवर कोलॅबमध्ये ऍड करू शकता. तुम्ही वाचकांनी शेअर केलेल्या रीलमधून एका बेस्ट रीलला आकर्षक नथ बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे तुमचा रील लवकरात लवकर पोस्ट करायला विसरू नका.

Story img Loader