Navratri 2024: नवरात्रौत्सवाचे नऊ दिवस मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. देवीचा जयघोष आणि गरब्याचा ताल हे या उत्सवाचे खरे आकर्षण आहे. या नऊ दिवसांत साक्षात जगदंबा पृथ्वीतलावर अवतरते, आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते आणि त्यांच्या दु:खांचे निवारण करते, अशी भाविकांची श्रद्धा असते. देवीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम घेऊन आले आहे नवरात्रौत्सव क्विझ. या क्विझमधील दहा प्रश्नांची उत्तरे द्या आणि देवीला आपल्या ज्ञान आणि भक्तीने प्रसन्न करा!
आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस दुर्गा देवीच्या उपासनेचा हा महोत्त्सव असतो, जो शारदीय नवरात्र म्हणून ओळखला जातो. दुर्गा देवीने शुंभ-निशुंभ, रक्तबीज आणि महिषासुरासारख्या राक्षसांचा नऊ दिवस चालणाऱ्या युद्धात वध केला, म्हणूनच नवरात्रौत्सव साजरा केला जातो. विजयादशमी हा तिच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. नवरात्रातील अष्टमी ही महाअष्टमी किंवा दुर्गाष्टमी म्हणून ओळखली जाते. बंगालमध्ये काली देवीच्या उपासकांची संख्या अधिक असल्यामुळे तेथे नवरात्रौत्सव विशेष प्रकारे साजरा होतो, ज्याला दुर्गापूजा किंवा पूजा-उत्सव म्हणतात. नवरात्रौत्सवाची समाप्ती नवव्या किंवा दहाव्या दिवशी केली जाते. काही ठिकाणी भाद्रपद वद्य अष्टमीपासून या उत्सवाची सुरुवात होते.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीने नऊ विविध रूपे धारण केली. त्यामुळे हे नऊ दिवस भक्तीच्या नऊ रूपांचे प्रतीक मानले जातात. या नऊ भक्तीमध्ये ‘श्रवण’, ‘कीर्तन’, ‘स्मरण’, ‘पादसेवन’, ‘वंदन’, ‘अर्चन’, ‘दास्य’, ‘सख्य’, आणि ‘आत्मनिवेदन’ यांचा समावेश होतो. या नऊ दिवसांच्या, नऊ रंगांसह आपल्या अंतर्मनातील रंगांचीही उधळण होते. याच भावनेतून ‘लोकसत्ता’ घेऊन आलं आहे नवरात्र क्विझ! या क्विझमधील दहा प्रश्नांची उत्तरे द्या आणि देवीला आपल्या ज्ञान आणि भक्तीने प्रसन्न करा!