Navratri Speical Dress 2023: गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर वेध लागतात ते नवरात्रीचे. सध्या बाजारात नवरात्रीची लगबग सुरू झाली आहे. यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबर २०२३ पासून होणार आहे. घटस्थापना झाल्यानंतर नऊ रात्र आदिशक्तीचा जागर केला जाईल. महाराष्ट्रातही विविध भागांमध्ये नवरात्रीदरम्यान देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाते. तर देवीसमोर दांडिया आणि रास गरबा खेळला जातो. हे नृत्य प्रकार गुजरातमधील असले तरी मुंबईसह अनेक शहरांमध्ये नवरात्रीमध्ये याच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासाठी तरुण तरुणी खास पारंपरिक कपडे परिधान करतात. तरुणी घागरा- चोळी, तर तरुण धोती-कुर्ता किंवा पायजमा-कुर्त्यामध्ये गरबा खेळण्याचा आनंद घेतात. यात तरुणींसाठी चनिया (घागरा)- चोळीचा नवा ट्रेंड दरवर्षी बाजारात पाहायला मिळतो. मग यंदा तुम्हालाही अशा ट्रेंडी घागरा-चोळी किंवा मुलांना धोती- कुर्ता खरेदी करायचा असेल तर मुंबईतील या मार्केट्सना नक्की भेट द्या.

मुंबईत घागरा-चोळी खरेदी करण्यासाठी बेस्ट ठिकाण

१) भुलेश्वर मार्केट

तुम्हाला अगदी स्वस्तात घागरा- चोळी खरेदी करायची असेल तर भुलेश्वर मार्केट बेस्ट आहे. या ठिकाणी तुम्हाला आकर्षक पॅचवर्क, आरसे, कवड्यांनी सजलेल्या ट्रेंडी घागरा-चोळीचे पॅटर्न पाहायला मिळतात. शिवाय विविध प्रकारची ज्वेलरीदेखील होलसेलच्या रेटमध्ये विकत घेता येते.

ठिकाण – भुलेश्वर मार्केट, बीएमसी मार्केट, मरीन लाईन्स ईस्ट, पांजरापोळ, भुलेश्वर, मुंबई.

कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ulta chashma
उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
arrival of vegetables in huge amount for Bhogi
भोगीनिमित्त भाज्यांची मोठी आवक; भुईमुग शेंग, भेंडी, पापडी, वालवर, वांगी, गाजर महाग
balmaifal story for children
बालमैफल : मी… अनादी, अनंत!
What is Kinkrant| Sankrant and Kinkrant Difference
Kinkrant 2025: किंक्रांत म्हणजे काय? का पाळला जातो हा दिवस; जाणून घ्या संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक
Tuljabhavani Devi procession of goddess carried out on tiger vehicle
शाकंभरी नवरात्र महोत्सव, दुसर्‍या माळेला तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा

जवळचे स्टेशन – चर्नीरोड

वेळ : सकाळी १० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत, सर्व दिवस.

२) नटराज मार्केट

मालाडमधील नटराज मार्केटमध्येही तुम्हाला नवरात्रीनिमित्त पारंपरिक गुजराती आणि राजस्थानी कपडे, साड्यांचे विविध ट्रेंड पाहायला मिळतील. या दिवसात अनेक महिला खरेदीसाठी नटराज मार्केटमध्ये गर्दी करतात. तुम्हाला इथे घागरा-चोळीच्या फॅब्रिकपासून ते शिवलेल्या ट्रेंडी ब्लाऊजपर्यंत विविध गोष्टी खरेदी करता येतात. शिवाय तुम्हाला ज्वेलरी खरेदीसाठी या ठिकाणीच विविध दुकानं आहेत.

ठिकाण : स्वामी विवेकानंद रोड, विजयकर वाडी इंडस्ट्रीयल, विजयकर वाडी, मालाड पश्चिम, मुंबई.

जवळचे रेल्वेस्थानक – मालाड.

वेळ : सकाळी ११ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत, गुरुवारी बंद.

३) मंगलदास मार्केट

मुंबईतील सर्वात जुने आणि चांगल्या दर्जाच्या वस्तू, कपडे विकत घेण्यासाठी मंगलदास मार्केट फेमस आहे. अनेक किरकोळ विक्रेते या ठिकाणाहून वस्तू खरेदी करतात आणि ते विविध ठिकाणी विकतात. या ठिकाणी तुम्हाला नवरात्रीतील कपड्यांचेही विविध प्रकार पाहायला मिळतील. शिवाय ज्वेलरी, मेकअप किटपासून विविध ब्युटी प्रोडक्टसही खरेदी करता येतील. नवरात्रीदरम्यान इथे तुम्हाला फॅब्रिक्समध्ये लेटेस्ट ट्रेंड पाहायला मिळतात.

ठिकाण : मंगलदास मार्केट, ६६ कांतीलाल एम. शर्मा स्ट्रीट, लोहार चाळ, काळबादेवी, मुंबई.

जवळचे रेल्वेस्थानक – मरीन लाईन्स.

वेळ : सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत, रविवारी बहुतेक दुकाने बंद असतात.

४) जांभळी गल्ली

जर तुम्हाला यंदा नवरात्रीदरम्यान खूप ट्रेंडी आउटफिट पाहिजे असतील, तर बोरिवलीतील जांभळी गल्ली एक बेस्ट ऑप्शन आहेत. मोक्ष मॉलच्या बाहेर तुम्हाला अनेक फेरीवाले गरब्यासाठी एकदम ट्रेंडी फॅशनेबल कपडे विकताना दिसतात. यात अगदी लहान मुलांपासून, तरुण-तरुणींसाठी विविध ऑप्शन आहेत. या ठिकाणीही तुम्हाला ज्वेलरीसाठीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

ठिकाण : जांभळी गल्ली, मोक्ष मॉलच्या समोर, बोरिवली पश्चिम, मुंबई.

जवळचे रेल्वेस्थानक- बोरिवली.

वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ७.३०, गुरुवारी बहुदा बंद असते.

५) मंगलम मार्केट

यंदा तुम्हाला नवरात्रीसाठी फॅन्सी आउटफिट कॅरी करायचे असेल तर हे मार्केट चांगला पर्याय आहे. इथे अनेक दुकानं आहेत, जिथे तुम्हाला फॅन्सी घागरा- चोळी मिळू शकतात. विशेषत: तरुणींसाठी इथे हमखास पर्याय उपलब्ध आहेत.

ठिकाण : दशरथलाल जोशी रोड, स्टेशनजवळ, एलआयसी कॉलनी, सुरेश कॉलनी, विलेपार्ले पश्चिम, मुंबई.

जवळचे रेल्वेस्थानक – विलेपार्ले.

वेळ : सकाळी १० ते रात्री ८, रविवारी बंद.

Story img Loader