Goddess Names For Baby Girls : सध्या नवरात्री सुरू आहे. सगळीकडे नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा केला आहे. जर तुमच्या घरी या नवरात्री दरम्यान मुलगी जन्माला आली असेल तर तुम्ही देवीच्या नावावरुन तुमच्या मुलीचे हटके नाव ठेवू शकता. आज आपण नवरात्रीत जन्मलेल्या मुलींची एकापेक्षा एक उत्तम नावे जाणून घेणार आहोत.
मुलगी हे देवीचं रुप असते. मुलगी ही घरची लक्ष्मी असते. नवरात्रीमध्ये नऊ दुर्गाच्या रुपात मुलींची पूजा केली जाते. अशात जर नवरात्रीदरम्यान तुमच्या घरी मुलगी जन्माला आली असेल तर देवीच्या नावावरुन तिचे सुंदर नाव ठेवू शकता.
१. दुर्गा – हिंदू धर्मातील प्रमुख देवीचे नाव दुर्गा आहे. दुर्गा देवीला आदिशक्तीसुद्धा संबोधले जाते. त्यामुळे तुमच्या मुलीचे नाव दुर्गा ठेवू शकता.
२. सरस्वती – सरस्वती म्हणजे विद्येची देवता होय. तुम्ही तुमच्या मुलीचे नाव सरवस्वती ठेवू शकता.
३. मिनाक्षी – मिनाक्षी हे देवीचे नाव आहे. सुंदर डोळे असणारी महिला असा अर्थ सुद्धा या नावाचा आहे. हे नाव सुद्धा तुम्ही तुमच्या मुलीचे ठेवू शकता.
४. तारा – तारा देवीची पुजा हिंदू आणि बौद्ध धर्मात केली जाते. तुम्ही तारा हे नाव मुलीचे ठेवू शकता.
५. गायत्री – गायत्री हे देवीचे नाव आहे. तुम्ही गायत्री हे देवीचे नाव ठेवू शकता.
६. अनिका – अनिका या शब्दाचा अर्थ प्रतिभावंत होतो. तुम्ही हे सुंदर नाव तुमच्या मुलीचे ठेवू शकता.
हेही वाचा : Weight Loss : वजन कमी करण्यासाठी फक्त या पाच सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…
७. तोशानी – तोशानी म्हणजे समाधानी व्यक्ती. तुम्ही तोशानी हे नाव ठेवू शकता.
८. साध्वी – साध्वी म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित करणारी व्यक्ती. तुम्ही तुमच्या गोंडस मुलीचे नाव साध्वी ठेवू शकता.
९. नित्या – नित्या म्हणजे नेहमी किंवा सैदव. तुम्ही हे नाव सुद्धा तुमच्या मुलीचे ठेवू शकता.
१०. माहेश्वरी – माहेश्वरी म्हणजे सर्वोच्च देवी. तुम्ही माहेश्वरी हे सुंदर नाव सुद्धा ठेवू शकता.
११. शक्ती – शक्ती म्हणजे ऊर्जेचा स्त्रोत. हे प्रभावी नाव तुमच्या मुलीचे ठेवू शकता.
१२. वारुणी – ज्या व्यक्तीकडे वरुण देवाची शक्ती आहे, त्याला वारुणी म्हणतात. तुमच्या मुलीचे हे नाव सुद्धा तुम्ही ठेवू शकता.
१३ . रुख्मिणी – रुख्मिणी हे सुंदर देवीचे नाव तुम्ही तुमच्या मुलीचे ठेवू शकता.
१४ . म्हाळसा – म्हाळसा हे नाव सुद्धा तितकेच सुंदर आहे. म्हाळसा देवीला पार्वतीचे रुप मानले जाते.
१५. सीता – सीता हे सुंदर नाव सुद्धा तुम्ही तुमच्या मुलीचे ठेवू शकता.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)