Navratri 2024 All about nine forms of Maa Durga and their stories : सध्या सणांचा काळ सुरु आहे. गणेशोत्सवानंतर हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण म्हणजे शारदीय नवरात्री. दरवर्षी चैत्र नवरात्री संपूर्ण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. नवरात्रीचा अर्थ नऊ रात्री असा होतो. हा उत्सव नऊ रात्री साजरा केला जातो, जिथे दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. यंदा चैत्र नवरात्री यंदा ३ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे आणि १२ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. नवदुर्गा मातेची नऊ रुपे कोणती आहेत आणि त्यामागची कथा काय आहे हे आपण जाणून घेऊ या?

या आहेत नवदुर्गा

शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री

माता दुर्गा आणि तिचे नऊ अवतार (Maa Durga and her nine avatars)

शैलपुत्री(Shailputri): माता शैलपुत्री हे दुर्गा मातेचे पहिले रूप आहे जिची चैत्र नवरात्रीत पूजा केली जाते. या देवीने एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ धारण केले आहे आणि ती नंदी नावाच्या बैलावर स्वार आहे. देवी पार्वती हिमालयाची कन्या म्हणून जन्मली आणि संस्कृतमध्ये शैल म्हणजे पर्वत, म्हणून तिला शैलपुत्री म्हणून ओळखले जाते

ब्रह्मचारिणी (Brahmacharini) : नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. या देवीच्या एका हातात रुद्राक्ष माळ आणि दुसऱ्या हातात पवित्र कमंडलू घेऊन देवी अनवाणी पायांनी चालते. या देवीचे तपस्वी स्वरूप देवी पार्वतीचे प्रतीक आहे जेव्हा ती भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी तिच्या गहन ध्यानात गुंतली होती.आहे.

चंद्रघंटा( Chandraghanta): नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पुजा केली जाते. या देवाला माता रणचंडी म्हणूनही ओळखले जाते. तसेच देवी चंद्रघंटाला तिसरा डोळा आहे आणि असे मानले जाते की, ते नेहमी राक्षसांशी लढण्यासाठी तयार असतात. तिला दहा हात आहेत. तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे, म्हणून तिला माँ चंद्रघंटा असे नाव पडले आहे. ती सर्व वाईट आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी वाघावर स्वार होते.

कुष्मांडा (Kushmanda) : चैत्र नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते. या देवीला अष्टभुजा देवी म्हणूनही ओळखले जाते आणि तिने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते. कुष्मांडा हे नाव तीन शब्दांपासून बनले आहे – ‘कु’ (थोडे), ‘उष्मा’ (उब किंवा ऊर्जा) आणि ‘आमंडा’ (अंडी), ज्याचा अर्थ विश्वाचा निर्माता आहे.

हेही वाचा – नऊ दिवसांचे नऊ रंग! नवरात्रीचे नऊ रंग माहितीये का? पाहा VIDEO अन् जाणून घ्या

स्कंदमाता (Skandamata) : चैत्र नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माँ स्कंदमातेची पूजा केली जाते. से मानले जाते की तिला चार हात, तीन डोळे आहेत आणि ती सिंहावर आरूढ आहे. ती कार्तिकेयाला मांडीवर घेऊन जात असल्याचेही चित्रित करण्यात आले आहे. या देवीला पंचमी असेही म्हणतात.

कात्यायनी (Katyayani): नवरात्रीच्या सहावा्या दिवशी कात्यायनी देवीची पुजा केली जाते. ही देवी शक्तीचे एक रूप आहे आणि तिला देवीला दुर्गामाताचे योद्धा रूप म्हणून ओळखली जाते. कात्यायन ऋषींनी माँ दुर्गेची तपश्चर्या करून तिला मुलगी म्हणून जन्म घेण्यास सांगितल्यामुळे तिचे नाव कात्यायनी ठेवण्यात आले आहे. कात्यायनी देवी पार्वतीच्या सर्वात हिंसक रूपांपैकी एक मानली जाते. तिच्याकडे चार हात असून तलवार आहे आणि सिंहावर स्वार आहे.

कालरात्री ( Kalaratri) : चैत्र नवरात्रीच्या सप्तमी किंव सातव्या दिवश माता कालरात्रीची पूजा केली जाते. काली माता म्हणूनही ओळखले जाते, कालरात्री हे माँ दुर्गेच्या सर्वात हिंसक स्वरूपांपैकी एक आहे. पौराणिक कथांनुसार तिने तिच्या त्वचेच्या रंगाचा त्याग केला आणि राक्षसांना मारण्यासाठी गडद रंगाचा स्वीकार केला. ती एक चार हात असलेली देवता आहे जी गाढवावर स्वार होते, तलवार, त्रिशूळ आणि फंदा धारण करते. तिच्या कपाळावर तिसरा डोळा आहे ज्यामध्ये संपूर्ण विश्व आहे असे मानले जाते.

हेही वाचा -Shardiya Navratri 2024 : शारदीय नवरात्री किती तारखेपासून सुरू होत आहे? घ्या जाणून घटस्थापनेचा मुहूर्त आणि पूजा विधी

महागौरी (Mahagauri): नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पुजा केली जाते. महागौरीला चार हात आहेत आणि तिच्या दोन हातात डमरू व त्रिशूळ आहे आणि दुसरे दोन हात वरद आणि अभय मुद्रामध्ये चित्रित केले आहेत. ही देवी बैल किंवा पांढऱ्या हत्तीवर स्वार होते.

सिद्धिधात्री (Siddhidhatri) : चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी माँ सिद्धिधात्रीची पूजा केली जाते. तिला सर्व सिद्धी देणारी म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की ती महाशक्तीचे मूर्त स्वरूप आहे आणि भगवान शिवाने तिची प्रार्थना केल्यावर सिद्धी प्राप्त केली. ही देवी ती कमळावर बसलेली असून देवीला चार हात आहे. तिच्या दोन हातात गदा, चक्र आहे आणि दुसऱ्या दोन हातात एक पुस्तक आणि कमळ धारण केले आहे. देवी दुर्गेचे हे रूप परिपूर्णतेचे प्रतीक आहे.