Navratri Fashion Trends Look : सध्या सगळीकडे नवरात्रीची तयारी जल्लोषात सुरू आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांचे आयोजन उत्साहाने सुरू आहे. नवरात्री उत्सव स्त्रियांसाठी खूप खास असतो. या नऊ दिवसांमध्ये महिला वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसतात आणि श्रृंगार करतात. देवीच्या मंडपात गरबा खेळतात.
यंदा नवरात्रीमध्ये गरब्यासाठी तुम्ही कोणते कपडे घालणार आहात? जर आतापर्यंत तुम्ही काही ठरवले नसेल तर तुम्ही काही ट्रेंडिंग फॅशन फॉलो करू शकता.

नवरात्रोत्सवातील सर्वात मोठा नृत्यप्रकार म्हणून दांडिया किंवा गरबा ओळखला जातो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने गरबा खेळतात. या गरबा महोत्सवात आपली वेशभूषा उठून दिसावी किंवा आपण सुंदर आणि हटके दिसावे, असे प्रत्येकाला वाटते.
खरं तर घागरा चोळी हा दांडिया किंवा गरबासाठी ठरलेला पेहराव आहे. पण, हे निवडताना तुम्ही यामध्ये आणखी हटके डिझाइनला प्राधान्य देऊ शकता.

good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Lucknow NGO helps underprivileged children make Sabyasachi-inspired clothes; the designer reacts
झोपडपट्टीतील मुला-मुलींनी तयार केला सब्यसाची-प्रेरित ब्रायडल कलेक्शन! स्वत:च मॉडेलिंग करत केले हटके फोटोशूट, पाहा Video Viral
Puneri kaka dance video uncle aunty dance video goes viral on social media
VIDEO: पुणेकर काकांचा नाद नाय! चंद्रा गाण्यावर केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणतात “आयुष्य असं जगता आलं पाहिजे”
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
group of women amazing dance on famous song Dilat Zapuk Zupuk vajta rahtay
“दिलात झापुक झूपूक वाजत राहतय ग” महिलांनी केला जबरदस्त डान्स, VIDEO एकदा पाहाच
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Dance Viral Video
‘डान्स असावा तर असा…’; ‘चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी’ गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्

हेही वाचा : Multigrain Rotis : मिश्र धान्यांची पोळी खाणे आरोग्यासाठी चांगले आहे का? वाचा, आहारतज्ज्ञ काय सांगतात…

नवरात्रीमध्ये तुम्ही मराठी अभिनेत्री प्राजक्ताने घातलेला हा केशरी रंगाचा लेहंगा घालू शकता. केशरी रंगाचा हा लेहंगा अत्यंत सुंदर आणि नीटनेटका दिसतो. यावर तुम्ही प्राजक्ताने कानात घातलेले त्याच रंगाचे झुमकेसुद्धा घालू शकता. तुमचा लूक आणखी उठून दिसेल.

मराठी अभिनेत्री आणि बॉलिवूडमध्येसुद्धा डंका वाजवणाऱ्या सई ताम्हणकरने मागील दिवाळीत लाल पिवळ्या रंगाचा सुंदर लेहंगा घातला होता. तुम्ही नवरात्रीमध्ये हा फॅशन ट्रेंड फॉलो करू शकता. सईचा हा लेहंगा पाहून तुम्हाला हळद कुंकूवाची आठवण येईल आणि नवरात्रीमध्ये हळद कुंकूला विशेष महत्त्व आहे.
याशिवाय लाल रंग हा देवीचा रंग म्हणून ओळखला जातो, त्यामुळे या लेहंगावर घेतलेली लाल ओढणी आणखी तुमचं सौंदर्य फुलवू शकते. त्यामुळे गरबा खेळताना हा लूक खूप छान दिसून येईल.

मराठी आणि बॉलिवूड अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. हाताने प्रिंट केलेल्या सुंदर लाल रंगाच्या लेहंगावरील फोटो नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावर तिने ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घातली आहे. तुम्हीसुद्धा गरबा खेळताना हा लूक फॉलो करू शकता.

बिग बॉस मराठी फेम सई लोकूर नेहमी तिचे नवनवीन लूकमधील फोटो शेअर करत असते. लेहंगाप्रमाणे नेसलेल्या पिवळ्या साडीमध्ये सई खूप सुंदर दिसतेय. या साडीचा पॅटर्न इतका सुंदर आहे की, तुम्हाला दुरून हा लेहंगा वाटेल. लेहंगासारखी दिसणारी ही साडी तुम्ही दांडिया खेळताना नेसू शकता.

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये मराठमोळ्या पैठणीचा राणी रंगाचा लेहंगा तिने घातला होता. या लेहंगामध्ये सोनालीने मराठमोळा लूक केला होता. हा नवा फॅशन ट्रेंडसुद्धा तुम्ही यंदा नवरात्रीच्या दांडिया उत्सवात फॉलो करू शकता.

हेही वाचा : शिल्पा शेट्टीने दिलेले हे चॅलेंज स्वीकारा; हात न सोडता, मनगट फिरवून दाखवा; पाहा VIDEO

फ्लोरल लेहंगाची सध्या सगळीकडे खूप मागणी सुरू आहे. प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये फ्लोरल लेहंगा घातला आहे. गुलाबी रंगाचा हा लेहंगा खूप सुंदर दिसतोय. हा लूकसुद्धा तुम्ही दांडियासाठी करू शकता.

जर तुम्हाला ओढणी घ्यायचा त्रास होत असेल तर सई लोकूरचा लांब स्कर्ट आणि टॉपचा हा लूक तुम्ही फॉलो करू शकता. या लूकमध्ये तुम्हाला गरबासुद्धा खेळता येईल. गरबा खेळताना तुम्ही या लूकवर फॅशनेबल चष्मा लावू शकता.

सध्या लेहंगावर ब्लाउजऐवजी शर्ट घालण्याचा नवा ट्रेंड सुरू आहे. तुम्ही या नवरात्रीमध्ये हा ट्रेंडसुद्धा फॉलो करू शकता. बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाने असाच एक लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात ती खूप सुंदर दिसतेय. तमन्नासारखा लूक करून तुम्ही इतरांपेक्षा हटके दिसाल.

याशिवाय जर तुम्हाला लेहंगा घालायचा नसेल तर तुम्ही इंडो-वेस्टर्न पॅटर्न ट्राय करू शकता. स्कर्टवर क्रॉप टॉप, जीन्सवर क्रॉप टॉप आणि ओढणी, प्लाजोवर क्रॉप टॉप आणि ओढणी असे फॅशन ट्रेंडसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता.