बुलढाणा : Navratri 2023 Marathi News विदर्भपंढरी शेगाव येथील गजानन महाराज संस्थानात रविवार( दि १६) पासून नवरात्री उत्सवाला थाटात प्रारंभ झाला. नवरात्रौत्सवानिमित्त दररोज सकाळी ६ ते ६.३० दरम्यान काकडा आरती, संध्याकाळी ४ ते ५ वाजेदरम्यान प्रवचन, ५.१५ ते ५.४५ हरीपाठ, रात्री ८ ते १० वाजता किर्तन असे धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. रविवारी शतचंडीयागास आरंभ झाला असून २३ ऑक्टोंबरला सकाळी १० वाजता यागाची पुर्णाहुती व अवभृतस्नान होईल. २४ ऑक्टोंबर रोजी दुपारी सिमोल्लंघनाकरीता संस्थानची पालखी निघणार आहे.
Navratri 2023: गजानन महाराज संस्थानमध्ये नवरात्रौत्सव; शतचंडीयागास प्रारंभ, २४ ला सीमोल्लंघन
Shardiya Navratri 2023 Marathi News विदर्भपंढरी शेगाव येथील गजानन महाराज संस्थानात रविवार( दि १६) पासून नवरात्री उत्सवाला थाटात प्रारंभ झाला.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 16-10-2023 at 09:12 IST
मराठीतील सर्व लोक उत्सव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri festival in gajanan maharaj sansthan start 24th scm 61 ysh