मुंबई : यंदा नवरात्रोत्सवात दोन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत धनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र हे दिवस वाढवून द्यावेत अशी मागणी उत्तर मुंबई मतदारसंघातील खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच सोसायट्यांमधील लहान उत्सव मंडळांना रात्री ११ वाजेपर्यंत परवानगी द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नुसार बंद जागांखेरीज अन्य ठिकाणी सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणासाठी काही ठराविक दिवस सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धकाचा वापर करता येतो. श्रोतेगृह, सभागृह, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यांसारख्या बंदिस्त जागा वगळून इतरत्र ध्वनिक्षेपकाचा वापर करता येतो. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यासाठी दिवस ठरवून देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> नवरात्रोत्सावानिमित्त मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या; अंधेरी पश्चिम आणि गुंदवलीदरम्यान रात्री १२.३० ला सुटणार शेवटची मेट्रो

त्यानुसार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या अधिकारातील १५ पैकी ११ दिवसांची यादी फेब्रुवारी महिन्यात जाहीर केली होती. त्यात मुंबईत नवरात्रोत्सवात अष्टमी आणि नवमी असे दोन दिवस रात्री उशीरापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यात आणखी दोन दिवस वाढवून द्यावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.  मुंबईत सर्व धर्मिय लोक राहतात. त्यामुळे मुंबईला एकूणच १५ दिवसांऐवजी जास्त दिवस परवानगी द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.