कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरातील नवरात्र उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंडप उभारणीचे काम गतीने सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोल्हापुरात शारदीय नवरात्र उत्सव थाटात साजरा केला जातो. महालक्ष्मी मंदिर परिसरात स्वच्छता, मंडप उभारणीचे काम पूर झाले आहे. वीज, प्रकाश व्यवस्था, बिनतारी यंत्रणा, सीसीटीव्ही, सुरक्षा आदी कामांचा आढावा घेण्यात आला आहे. भाविकांना दर्शन सुरळीत व्हावे यासाठी देवस्थान समितीने नियोजन केले आहे. भवानी मंडप ते शिवाजी महाराज चौक या मार्गावर दर्शन रांग असायची. आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून देवस्थान परिसर तसेच शेतकरी संघाच्या इमारतीमध्ये दर्शन रांग वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा >>>कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाडीला विरोध करत १८ गावांमध्ये बंद; व्यवहार ठप्प
उत्सव शांततेने मंगलमय वातावरणात व्हावा असे नियोजन झाले आहे. दरम्यान, कोल्हापूर शहरामध्ये उत्सवासाठी मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कुंभारवाड्यामध्ये देवीच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवला जात आहे.
पत्रकारांना मुभा
आज जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याशी कोल्हापूर प्रेस क्लब पदाधिकारी व सदस्य यांच्या झालेल्या बैठकीत अंबाबाई मंदिराची पर्यायाने कोल्हापूरची प्रतिमा अबाधित राहील, अशा प्रकारचे वार्तांकन आणि जे चुकीचे वाटते; त्याठिकाणी जबाबदार अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करून बातम्या प्रसारित कराव्यात. अशा जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या विनंती वरून आजच्या गुरुवारी संध्याकाळ पासून सर्व अधिकृत माध्यमांच्या पत्रकारांना व कॅमेरामन यांना मुक्त प्रवेश देण्याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे आणि मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह सिक्युरिटी प्रमुखांना सुद्धा तशा सूचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले आहे.यावेळी प्रेस क्लब अध्यक्ष शितल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर,संचालक समीर मुजावर,सुखदेव गिरी,अनिल देशमुख,रणजित माजगावकर,मिथुन राज्याध्यक्ष,शेखर पाटील,ओंकार वळवडे,नयन यादवाड,श्रीकांत पाटील,दुर्वा दळवी,सुरज पाटील,महेश कांबळे,जावेद तांबोळी,इंदुमती गणेश आदी पत्रकार उपस्थित होते.