Navratri 2023 : शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे नऊ रात्री आणि नऊ दिवसांचे महत्वाचे व्रत. या उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे. नवरात्रीच्या काळात देवी व तिच्या विविध रूपांची पूजा केली जाते. आदिशक्तींच्या उपासनेचा पवित्र सण घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत साजरा केला जाणार आहे. यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव १५ ते २४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये साजरा केला जाणार आहे. राज्यासह देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या आनंदाने आणि जल्लोषात साजरा केला जातो. या उत्सवानिमित्ताने तुमच्या प्रियजनांना आणि नातलगांना नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।
नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
कुंकवाच्या पावलांनी देवी दुर्गा तुमच्या घरी येवो,
सुख-संपत्तीसह तुम्हाला उदंड आरोग्य मिळो.
शारदीय नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
“नव कल्पना
नव ज्योत्स्ना
नव शक्ती
नव आराधना
नवरात्रीच्या या पावन पर्वावर पूर्ण होवोत तुमच्या सार्या मनोकामना”
शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
नारी तू नारायणी। नारी तू सबला।।
तुझ्या तेजाने उजळे सृष्टी। नमितो आम्ही तुजला।।
शुभ नवरात्री!
ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।
नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
तुमच्यावर सदैव लक्ष्मीचा आशीर्वाद असो,
तुम्हाला सदैव सरस्वतीची साथ मिळो,
तुमच्या घरात सदैव गणेशाचे वास्तव्य असो,
माँ दुर्गेच्या आशीर्वादाने तुमचे आयुष्य अधिक प्रकाशमय होवो…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां
क्लेशापासूनि सोडी तोडी भव पाशा
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा
सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ! दुर्गा माता आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो याच सदिच्छा.
देवी आदिशक्तीची कृपा तुमच्यावर सदा राहो।
अक्षय धन, सुख समृद्धी आणि ज्ञानाचा साठा होवो।।
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!