Shankarpali recipe in marathi : दिवाळी अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे, दिवाळी म्हंटलं पहिली आठवणारी गोष्ट म्हणजे फराळ. फराळाशिवाय दिवाळी होऊच शकत नाही. घराघरांमध्ये आता दिवाळीच्या फराळाची लगबग सुरु झाली आहे. महिलांनी एक एक पदार्थ करायला सुरुवात केली असून आज आम्हीही तुमच्यासाठी एक फराळाचा खास पदार्थ घेऊन आलो आहोत. चला तर आज जाणून घेऊयात खुसखुशीत शंकरपाळ्या रेसिपी.
शंकरपाळी साहित्य
- ४ कप मैदा
- १ कप दूध
- १ कप पिठी साखर
- ३/४ कप तूप
- मीठ
- तळण्यासाठी तेल
- कुकिंग सूचना
शंकरपाळी कृती
स्टेप १
सुरुवातीला मैदा चाळून घ्या. एका परातीत मैदा घ्यावा.
स्टेप २
एका भांड्यात साखर घ्यावी.त्यात दूध टाकावे.
स्टेप ३
दुधामध्ये साखर विरघळेपर्यंत ते गरम करावे. आणि गॅस बंद करावा.
स्टेप ४
एका पॅनमध्ये तूप टाकून ते गरम करायला ठेवावे. आता हे गरम झालेले तूप मैद्यामध्ये ओतावे.
स्टेप ५
आता हे मोहन मैद्याला चांगल्या तऱ्हेने चाळून घ्यावे. म्हणजे त्याची मूठ तयार झाली पाहिजे.
स्टेप ६
आता यामध्ये दूध आणि साखरेची जे मिश्रण तयार केले आहे ते थोडे थोडे टाकून त्याचा गोळा बनवावा. गोळा कडक व्हायला हवा. याची काळजी घ्यावी. साखरेचे मिश्रण कमी जास्त लागू शकते. आता हा गोळा पंधरा-वीस मिनिटं ओल्या कपडाने झाकून बाजूला ठेवा.
स्टेप ७
१५-२० मिनिटांनी पुन्हा एकदा मैदाचा गोळा छान मळून घ्यावा. त्यातील एक मोठा गोळा घेऊन त्याची जाड पोळी लाटावी. त्याच्या कडा तुटलेल्या असल्या तरी चालेल. त्यानंतर शंकरपाळे कापणीच्या साह्याने आपल्याला पाहिजे त्या आकारात शंकरपाळे कापून घ्यावे. अशाप्रकारे सर्व शंकरपाळे तयार करून घ्यावे.
स्टेप ८
एका बाजूला तेल गरम करण्यासाठी ठेवावे. मध्यम आचेवर सर्व शंकरपाळे थोडे थोडे टाकून सोनेरी रंगावर तळून घ्यावे.
हेही वाचा >> जिभेवर ठेवताच विरघळणारी “खुसखुशीत करंजी”; दिवाळीच्या फराळाला परेफेक्ट रेसिपी
स्टेप ९
मस्त खुसखुशीत गोड शंकरपाळी तयार आहेत, आस्वाद घेण्यासाठी.