वाई: Navratri 2023 Marathi News ‘उदे गं अंबे उदे’च्या जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात सातारा शहर व जिल्ह्यातील मंदिरात विधिवत शारदीय नवरात्रोत्सवाला सुरवात झाली. सार्वजनिक उत्सव मंडळांनी देवींच्या मूर्तींची मिरवणुक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. अश्विन शुद्ध प्रतिपदे पासून पुढील नऊ दिवस शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रविवारी दुपारी दीड वाजेपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त असल्याने भाविकांची घटस्थापनेसाठी धांदल उडाली होती. घरोघरी घटस्थापनेने नवरात्रोत्सवास उत्साही वातावरणात प्रारंभ झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किल्ले प्रतापगडावर भवानी माता मंदिर, अजिंक्‍यताऱ्यावरील मंगळाई, यमाई (औंध), साखरगड निवासिनी (किन्हई), मांढरदेव येथील काळूबाई, देऊर येथील मुधाई, कण्हेर येथील वाघजाई, आसले येथील भवानी माता, पांडे येथील भैरवनाथ व वाईच्या व्यंकटेश मंदिरात घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी दुर्गामातेच्या जयघोषात मिरवणुका काढून देवींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तुळजापूर, प्रतापगड अजिंक्‍यतारा, औंध आदी शक्तिस्थानावरून शक्तिज्योती प्रज्वलित करून आणल्या. कार्यकर्ते देवी जगदंबेचा जयजयकार करत होते. सायंकाळी उशिरापर्यंत मूर्तींची प्रतिष्ठापना केली जात होती.

हेही वाचा >>> Dussehra 2023: नवरात्रौत्सवानिमित्त नागरिकांची खरेदीला गर्दी; फुलबाजार, पुजा साहित्यासाठी सर्वाधिक गर्दी

साताऱ्यातील मिरवणुकांना सकाळीपासून ढोल-ताशांच्या गजरात सुरुवात झाली. कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणांनी वातावरण दुमदुमत होते. सातारा शहरातील मोती चौक, राजवाडा पंचपाळे हौद दुर्गा माता मंदिरात पहिल्या दिवशी श्रीशैलपुत्री रूपातील तसेच विविध फुलांचा साज शृंगार केलेली दुर्गादेवीची पूजा बांधण्यात आली होती. सातारा  कृष्णा नगर परिसरातील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील श्री उमादेवीच्या नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. मंदिरामध्ये पुढील नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये धार्मिक कार्यक्रम, होम, हवन, कुमारी पूजा, सुवासिनी पूजा तसेच दीपोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भरतनाट्यम गिटार वादन व गायन रास-दांडियाही रंगणार आदी कर्यक्रम कार्यक्रम सादर होणार आहेत.

मराठीतील सर्व लोक उत्सव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shardiya navratri festival begins in satara in a religious atmosphere ysh
Show comments