कोल्हापूर : Navratri 2023 Marathi News शारदीय नवरात्र उत्सवाला करवीरनगरीत रविवारी मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. नवरात्रच्या या उत्सवाचा जागर करण्यासाठी साडेतीन शक्तिपीठांपकी एक असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी  गर्दी केली होती. मंदिरात तोफेची सलामी देण्यात आल्यानंतर घटस्थापना करण्यात आली. पहिल्याच दिवशी महालक्ष्मीची सिंहासनारुढ पूजा  साकारण्यात आली होती. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंदीरात आदिशक्तीच्या जागराला आजपासून सुरवात झाली. महाराष्ट्र, आंध्र कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात आजपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. दुपारी दीड वाजेपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त असल्याने पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गाभाऱ्यात घटस्थापना विधी झाल्यानंतरतोफेच्या सलामीने देवीच्या नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला.

हेही वाचा >>> Dussehra 2023 : धार्मिक वातावरणात शारदीय नवरात्र उत्सवाला साताऱ्यात प्रारंभ

पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने मंदिर परिसरात बॅरिकेट्स लावून दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत. नवरात्रीचं पावन पर्व दुर्गामातेसाठी समर्पित आहे. देवी दुर्गेला शक्ती आणि उर्जेचं प्रतिक मानले जाते.  नवरात्रीत दुर्गेच्या सर्व नऊ रुपांची विधिवत पूजा अर्चा केली जाते.

मराठीतील सर्व लोक उत्सव बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The sharadiya navratri festival of mahalakshmi begins in the crowd of devotees ysh
Show comments