Navratri Nine Colors: यंदा १५ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या दिवसांमध्ये नवरात्री साजरी होणार आहे तर २४ ऑक्टोबरला दसऱ्याचा मुहूर्त आहे. शक्तीचा उत्सव म्हणून नवरात्री सणाकडे पाहिले जाते. मागील काही वर्षांमध्ये नवरात्री आणि नऊ रंग हे कॉम्बिनेशन अगदी अतूट झालं आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये रेल्वे स्टेशन, बस, ऑफिस, गरबा- दांडियाला एकाच रंगात नखशिखांत सजून अनेकजण दिसतात. तुम्हालाही हा उत्साह असेल तर यंदाच्या नवरात्रीत तुमच्यासाठी आम्ही एक खास संधी घेऊन आलो आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फॅमिलीच्या ग्रुपवर किंवा फक्त Whatsapp status, Instagram Story मध्ये तुमचा उत्साह दाखवण्यासह तुम्ही चक्क लोकसत्ता.कॉमवर झळकू शकता. लोकसत्ता ऑनलाईनच्या ‘तू ही दुर्गा’ या उपक्रमात सहभागी होऊन अगदी सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा आणि तुमच्या मैत्रिणींचा, कुटुंबीयांचा, पार्टनरचा फोटो सुद्धा अपलोड करू शकता. याशिवाय यंदा तुमच्यातील क्रिएटिव्हिटीला मंच देण्यासाठी आम्ही ‘रील स्पर्धा’ सुद्धा सुरु करत आहोत. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे सर्व वाचकांनी शेअर केलेल्या फोटोपैकी तीन बेस्ट फोटोंना व एका बेस्ट रीलला एक अत्यंत सुंदर नथ बक्षीस म्हणून पटकावता येणार आहे.

‘तू ही दुर्गा’ असे अपलोड करा नवरंगातील तुमचे फोटो

  • www.loksatta.com च्या ‘होम-पेज’वरील ‘’तू ही दुर्गा’उपक्रमात सहभागी व्हा’ बॅनरवर क्लिक करा.
  • आता नवीन टॅब उघडेल. येथे फोटो अपलोड करून तुमची माहिती भरा आणि ई-मेल आयडीने साइन अप करा.
  • मोबाइल कॅमेऱ्याने काढलेला फोटो थेट अपलोड करण्याची सुविधादेखील याठिकाणी उपलब्ध आहे.
  • फोटोची फाईल साइज ५ एमबीपेक्षा कमी असावी.
  • फोटो JPG, JEPG व PNG फॉरमॅट मध्ये असावा.

‘तू ही दुर्गा’ Reel स्पर्धेचे तपशील

  • तुम्हाला नवरात्री विशेष रील बनवायची आहे. ज्यामध्ये तुमचा नवरात्र उत्साह कल्पकतेसह दिसायला हवा.
  • हा व्हिडीओ तुम्ही रीलप्रमाणे 9 X 16 स्वरूपात बनवायचा आहे.
  • अपलोड करताना आपल्याला कोलॅब करण्यासाठी @loksattalive इन्स्टाग्राम पेजला ऍड करायचे आहे.
  • यानंतर आम्ही तुमची रिक्वेस्ट स्वीकारून तो व्हिडीओ लोकसत्ताच्या इन्स्टाग्राम पेजवर झळकेल.

नियम आणि अटी –

१. ही स्पर्धा मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर येथे वास्तव्यास असलेल्या वाचकांसाठी खुली असेल.
२. स्पर्धा १५ ऑक्टोबरपासून सुरू होईल. २४ ऑक्टोबर हा स्पर्धेत फोटो पाठवण्याचा शेवटचा दिवस असेल.
३. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
४. १८ वर्षांवरील कुणीही व्यक्ती स्पर्धेत सहभागी होऊ शकते. त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीसाठी आई- वडील किंवा पालकांची संमती असणे आवश्यक आहे.
५. फोटो आणि रील व्हिडिओ नवरात्रोत्सवाशी संबंधित संकल्पनेचे (थीम) असावेत. शिवाय आपण पाठविलेले फोटो आणि रील्स मूळ तुमचे स्वतःचेच (किंवा तुम्ही स्वत:च शूट केलेले) असणे आवश्यक आहे. फोटोचे ठिकाण, वेळ व दिनांक याचा त्यासोबत स्पष्ट उल्लेख असावा.
६. बक्षीसपात्र फोटो ज्या स्पर्धकाने अपलोड केला आहे, त्याच्याशी इमेलद्वारे संपर्क साधण्यात येईल.
७. बक्षीसपात्र रील्ससाठी संबंधित हँडलवर मेसेजद्वारे त्या स्पर्धकाशी संपर्क साधण्यात येईल.
८. बक्षीस स्वीकारण्यासाठी येताना (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायन्स) ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे.
९. विजेत्याने बक्षीस स्वीकारण्यास असमर्थता दर्शविल्यास अथवा ठरलेल्या दिवशी गैरहजर राहिल्यास बक्षीस गोठवण्यात येईल.
१०. फोटो अथवा रील अपलोड झाल्यानंतर स्पर्धकांना कोणत्याही कारणाने सहभाग मागे घेण्यास अनुमती नाही.
११. बक्षीस अहस्तांतरणीय, अदलाबदल न करता येण्याजोगे आणि ना-परतावा आहे. बक्षिसाऐवजी रोख रक्कम दिली जाणार नाही. विजेत्यानेच बक्षीस स्वीकारायचे आहे.
१२. आयइ ऑनलाइन मीडिया सर्व्हिसेस (प्रा.) लिमिटेडचा कोणताही कर्मचारी अथवा त्याच्या कुटुंबीयांस या स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
१३. बक्षीस वितरणाच्या ठिकाणी येण्याची व्यवस्था स्पर्धकाला स्वत:च करावयाची आहे. त्यासंदर्भात आयोजक कंपनीची कोणतीही जबाबदारी असणार नाही.
१४. या स्पर्धेचे आयोजक (आयइ ऑनलाइन मीडिया सर्व्हिसेस (प्रा.) लिमिटेड) यांनी कोणत्याही वेळी कोणतीही सूचना न देता सदर स्पर्धा आणि/ किंवा तिचे संबंधित नियम यात बदल करण्याचा, तसेच ही स्पर्धा तहकूब, रद्द किंवा सुधारित करणे, तसेच यात अन्य कोणत्याही प्रकारे भर घालणे/ वाढ करणे किंवा विभाजन करणे इत्यादीचे, तसेच बक्षिसामध्ये बदल करण्याचे आयोजकांचे अधिकार राखून ठेवले आहेत. स्पर्धेत व जागेवर प्रवेश देणे/ नाकारणे याचेही अधिकार आयोजकांनी राखून ठेवले आहेत.
१५. विजेते ठरविणे यासाठी आयोजक (दी इंडियन एक्स्प्रेस ऑनलाइन मीडिया लिमिटेड) एक परीक्षक मंडळ नियुक्त करेल. परीक्षकांचा व दी इंडियन एक्स्प्रेस ऑनलाइन मीडिया लिमिटेड यांचा निर्णय अखेरचा व बंधनकारक राहील.
१६. स्पर्धेसंदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी आपण contact@loksatta.com या इमेल आयडीवर संपर्क साधू शकता. इमेलच्या सब्जेक्टमध्ये मात्र ‘तू ही दुर्गा स्पर्धा’ असा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे.
१६. स्पर्धा आयोजक विजेत्यांची नावं जाहीर करतील. बक्षिसाऐवजी कोणतीही रोख रक्कम किंवा मोबदला दिला जाणार नाही.
१७. आपला स्पर्धेतील सहभाग हाच आपण पाठविलेले फोटो आणि रील अपलोड करणे, वापरणे, त्या संदर्भातील इतर सर्व प्रकारचा वापर या संदर्भातील सर्व अधिकार आयोजक आयइओएमएसपीएल यांना देणारा असेल. १८ वर्षाखालील व्यक्तींसाठी त्यांचे आई- वडील वा पालक यांनीही ते अधिकार आपला सहभाग नोंदवितानाच दिलेले असतील. आपला सहभाग हा वापरासंदर्भातील अधिकार देण्याचाच एक महत्त्वाचा भाग असेल.
१८. फोटो किंवा रील ज्याने सादर केली आहे, त्याची ती मूळ कलाकृती नाही अशा प्रकारचा एखादा दावा, नोटीस किंवा माहिती मिळाल्यास आणि किंवा नियम आणि अटींचा स्पर्धक सहभागींकडून भंग झाला आहे असे निदर्शनास आल्यास लोकसत्ता डॉट कॉम आणि आयइओएमएसपीएल कडे बक्षिसासंदर्भातील सर्वाधिकार राहतील. ते बक्षीस गोठविण्याचा अधिकारही त्यात समाविष्ट आहे.
१९. मुंबईतील न्यायालयाच्या विशेष कार्यक्षेत्रातच याचा समावेश असेल.

आता वाट कसली पाहताय? लगेचच फोटो व रीलच्या आयडीया तयार करा व सोप्या स्टेप्स फॉलो करून अपलोड करा. आणि हो, तुम्हा सर्वांना लोकसत्ता परिवारातर्फे नवरात्रीच्या शुभेच्छा!