Upvasacha Dhokla : ढोकळा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडतो. तुम्ही कधी उपवासाचा ढोकळा खाल्ला आहे का? होय, उपवासाचा ढोकळा जो शिंगाडा आणि वरई पीठापासून बनविला जातो. सध्या नवरात्रीमध्ये तुम्ही हा स्वादिष्ट उपवासाचा ढोकळा बनवू शकता. त्यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घ्या.
साहित्य
- शिंगाड्याचं पीठ
- वरईचं पीठ
- हिरव्या मिरचे
- इनो
- ओलं खोबरं
- लाल तिखट
- काळीमिरी पावडर
- दही
- तेल
- मीठ
हेही वाचा : Banana Salad : फक्त पाच मिनिटांमध्ये बनवा केळीचे सॅलड, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
कृती :
- सुरुवातीला मिरच्यांची बारीक पेस्ट करा
- शिंगाड्याचं पीठ आणि वरईचं पीठ एकत्र करा.
- यात मिरच्यांची पेस्ट, दही, काळीमिरी पावडर, मीठ, लाल तिखट टाका आणि मिश्रण एकजीव करा.
- दहा मिनिटे हे मिश्रण ठेवा. त्यानंतर त्यात इनो आणि तेल टाका
- ढोकळ्याच्या साचेला तेल लावा आणि त्यात हे मिश्रण टाका
- ढोकळ्याचा साचा स्टीमरमध्ये ठेवा आणि मंद आचेवर ढोकळा शिजू द्या.
- ढोकळा शिजल्यानंतर स्टीमरमधून बाहेर काढा आणि थोडा वेळ थंड होऊ द्या.
- त्यानंतर त्याचे बारीक काप करा.
- त्यावर ओलं खोबर टाका आणि शेंगदाण्याच्या चटणीबरोबर ढोकळा सर्व्ह करा.