ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांची श्रद्धांजली सभा आज पार पडली. मात्र शीतल आमटे यांच्या शोकसभेला आमटे कुटुंबीयांपैकी एकही सदस्य उपस्थित न राहिल्याने पुन्हा एकदा आमटे आणि करजगी कुटुंबीयांमधील वादाची किनार दिसून आली. या श्रद्धांजली सभेला आनंदवनाशी संबंधित अनेकांनी प्रत्यक्षपणे तर काहींनी झूम अॅपद्वारे आपली उपस्थिती नोंदवली. मात्र आमटे कुटुंबातील एकही व्यक्ती शीतल आमटे यांच्या श्रद्धांजली सभेसाठी हजर राहिली नाही.

डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सासू सासरे शिरीष आणि सुहासिनी करजगी यांनी फेसबुक पोस्ट लिहून आमटे कुटुंबीयांवर आरोप केले होते. मात्र श्रद्धांजली सभेच्या वेळी हे वाद बाजूला ठेवून आमटे कुटुंबीय हजर राहतील असं वाटलं होतं. पण तसे काहीही न घडल्याने आमटे आणि करजगी कुटुंबातील वाद संपलेला नाही हेच दिसून आलं. करजगी कुटुंबाने आमटे कुटुंबीयांची गैरहजेरी आणि ती फेसबुक पोस्ट यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शीतल आमटे-करजगी यांचा ३० नोव्हेंबरला आनंदवनात राहत्या घरी मृत्यू झाला. शीतलचा मृत्यू अपघाती की आत्महत्या याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.निलेश पांडे व त्यांची टीम करते आहे. त्यांच्या मृत्यूने आनंदवन परिवारासोबतच संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. आज रविवार १३ डिसेंबर रोजी डॉ.शीतल यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी आनंदवनात एका शोकसभेचे आयोजन केले होते.  दुपारी १२ वाजता आयोजित या श्रद्धांजली सभेला शीतल आमटे यांचे असंख्य चाहते उपस्थित होते. मुंबई येथील सुजाता देशमुख यांनी शीतल यांच्या दूरदृष्टीतून वर प्रकाश टाकत, शीतल यांची संवेदनशीलता धैर्य आणि विविध प्रकल्प अधोरेखित केले.

‘भारत जोडो’चे दिल्ली येथील कार्यकर्ते अनिल हेबर यांनी आपल्या भावना व्यक्त करीत शीतल यांच्या आठवणींचा मागोवा घेतला. बालग्राम अनाथ संस्थेचे संतोष गरजे तसेच विवेक तोंडापूरकर यांनी डॉ. शीतल यांच्या आनंदवनातील भरीव कामाचे कौतुक करत श्रद्धांजली अर्पण केली. डॉ सागर वझे, डॉ सुहास पोद्दार, अमृता कुलकर्णी आणि माधवी कद्रेकर यांनीही ही शीतल यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाचा परामर्श घेत आदरांजली वाहिली. याप्रसंगी फेसबुक वरून थेट जोडलेले इंग्लंड येथील लूसियन टर्नव्हिस्की आणि संजीव करजगी यांनीही ही शीतल यांना शब्दसुमने अर्पण केली.

प्राचार्य डॉ मृणाल काळे यांनी डॉ विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांनी पत्राद्वारे पाठविलेल्या शोक संदेशाचे वाचन केले. याप्रसंगी डॉ शीतल आमटे यांचे पती गौतम करजगी यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याकरिता विनंती करण्यात आली, मात्र त्यांना अश्रू आवरता आले नाही आणि ते निशब्द झाले. डॉ शीतल आमटे यांचा दहा वर्षीय शर्विल मुलगा निरागसपणे हा दु:खद प्रसंग आपल्या डोळ्यात साठवत होता. डॉ शीतल यांच्यासोबत विविध प्रकल्पात कार्य करणारे सहकारी आणि आमटे कुटुंबीय यांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकत होती. शोकसभेचे सूत्रसंचालन रवींद्र नलगटीवार यांनी केले तर

या श्रद्धांजली कार्यक्रमाला आमटे कुटुंबातील डॉ.विकास, डॉ.भारती, कौस्तुभ आमटे किंवा डॉ.प्रकाश, डॉ.मंदाकीनी, अनिकेत, दिगंत आमटे यापैकी कुणीही हजर नव्हते.

Story img Loader