हळेकन्नड लिपी, दान दिल्याचा तपशील

दिगंबर शिंदे, लोकसत्ता

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

सांगली : कर्नाटक सीमेवर असलेल्या जत तालुक्यातील बालगाव येथे सुमारे ९०० वर्षांपूर्वीचा शिलालेख उजेडात आला असून हळेकन्नड लिपीतील या १३ ओळींच्या लेखामध्ये दान दिल्याचा उल्लेख आढळला असल्याचे मिरज इतिहास संशोधन मंडळाचे प्रा. गौतम काटकर व मानसिंग कुमठेकर यांनी सांगितले.

जत तालुक्यातील बालगांव येथे चालुक्य राजा तिसरा सोमेश्वर उर्फ भूलोकमल्ल याच्या कारकिर्दीतील त्याचा मांडलिक बिज्जल कलचुरी याने दिलेला दानलेख आढळला आहे. सन ११३७ मधील हा लेख असून, यामध्ये बालगांव येथील कळमेश्वर स्वामी यांना दान दिल्याचे म्हटले आहे. सुमारे ८८४ वर्षांपूर्वीच्या या लेखातून सांगली जिह्यच्या तत्कालीन राजकीय व धार्मिक इतिहासावर प्रकाश पडणार आहे.

बालगांव येथील अल्लमप्रभू देवस्थानालगत हळेकन्नड लिपीतील एक शिलालेख आढळून आला. भग्नावस्थेतील शिलालेखावर सूर्य-चंद्र, शिविलग, गाय-वासरू, कटयार अशी चिन्हे कोरली आहेत. शिलालेख अभ्यासासाठी सागर कांबळे, डॉ. महेंद्र बोलकोटगी (जमगी), प्रभाकर सलगर (बालगाव), मधू पाटील (बालगाव) यांची मदत झाली.

या लेखात बालगांवमधील कळमेश्वर स्वामींना बिज्जल कलचुरी राजाने सूर्यग्रहणाच्या दिवशी दान दिल्याचा उल्लेख आहे.

बालगांवमधील एका स्वामींना िपगळनाम संवत्सराच्या वर्षी सोमवार असताना कार्तिक महिन्यात दान दिल्याचे म्हटले आहे. या वेळी चालुक्यराजा भूलोकमल्ल तथा तिसरा सोमेश्वर याच्या राज्यरोहणाचे १३ वे वर्ष सुरू होते. बिज्जल कलचुरीचा हा जिह्यत सापडलेला कालदृष्टया पहिला शिलालेख आहे. बिज्जल कलचुरी हा चालुक्यांचा नातेवाईक होता. चालुक्यराजा सहाव्या विक्रमादित्याची पत्नी चंदलदेवी ही बिज्जलाची आजी होती.

बिज्जल राजा हा पराक्रमी होता. प्रारंभी तो चालुक्यांचा मांडलिक असला तरी त्याने ११५६ मध्ये चालुक्याचे मांडलिकत्व झुगारुन देऊन सध्याच्या सांगली, सातारा, सोलापूर या भूभागावर आपली सत्ता प्रस्थापित केली.

कलचुरी राजसत्तांची माहिती

मिरज इतिहास संशोधक मंडळाच्या अभ्यासकांना बालगांव येथे सापडलेल्या या नव्या शिलालेखामुळे सांगली जिह्यतील सुमारे ८८४ वर्षांपूर्वीच्या राजकीय आणि धार्मिक इतिहासावर प्रकाश पडणार आहे. बिज्जल कलचुरी याच्या ताब्यात सध्याच्या सांगली जिह्यचा बहुतांश भाग होता. त्यामुळे जिह्यच्या विविध भागात त्याचे शिलालेख आजवर आढळून आले आहेत. यामध्ये देिशग-बोरगांव, भाळवणी, वळसंग याठिकाणी त्याच्या कारकिर्दीतील शिलालेख सापडले आहेत. या शिलालेखांमधून कल्याणीचे चालुक्य राजे आणि त्यांचे मांडलिक असलेल्या कलचुरी राजसत्तांची माहिती मिळते.

 

 

Story img Loader