केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा रद्द करण्याच्या राणेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यानंतर नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. भाजपा नेते आणि कोकणामधील जन आशिर्वाद यात्रेचे समन्वयक प्रमोद जठार यांनी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नारायण राणे कोणत्याही अटक वॉरंटशिवाय संगमेश्वरला पोहोचले असल्याचे म्हटले होते. रत्नागिरी पोलीस अधीक्षकांवर राणेंना अटक करण्यासाठी प्रचंड दबाव आहे आणि त्यांना ५ मिनिटात अटक करण्यास सांगितले आहे, असे जठार यांनी म्हटले होते. त्यानंतर नारायण राणे यांना ताब्यात घेत अटक केली. यावर संभाजी महाराजांनासुद्धा याच संगमेश्वरात अटक झाली होती आणि आणि औरंबगजेबचं सरकार पडलं होतं अशी प्रतिक्रिया प्रमोद जठार यांनी दिली. मात्र आता नारायण राणेंची तुलना संभाजी महाराजांशी केल्याने समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जठार यांच्यावर टीका केलीय.

जठार काम म्हणाले…

virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
truck hit young mens carrying a flame on the occasion of Sacrifice Day
बलिदान दिनानिमित्त ज्योत घेऊन निघालेल्या तरुणांना ट्रकची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
nagpur and bhandara,dhirendra shastri, bageshwar dham, controversial statement, jumdev maharaj, followers, Sparks Outrage, fir register, arrest demand, maharashtra, marathi news,
बागेश्वर बाबा वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत, जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भंडारा, नागपूरमध्ये तणाव

“जन आशीर्वाद यात्रा आजच्या दिवसापुरती थांबलेली आहे. यात्रेचे परिवर्तन आता आंदोलनात झाल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत नारायण राणेंची सुटका होत नाही तोपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात भाजपा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. सरकारने एक लक्षात घ्यावं छत्रपती संभाजी महाराजांनासुद्धा याच संगमेश्वरात अटक झाली आणि औरंगजेबाचं सरकार संपलं होतं. त्यामुळे या सरकारचं थडगं या महाराष्ट्रात उभं केल्याशिवाय भाजपा राहणार नाही,” अशी प्रतिक्रिया प्रमोद जठार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

“तिकडे बलात्कारी, १०० कोटींची खंडणी घेणारे मोकळे फिरतायत सरकारला लाज वाटली पाहिजे. आमच्या या मराठ्याला या संगमेश्वरात अटक झालेली आहे. जोपर्यंत नारायण राणेंची सुटका होत नाही तो पर्यंत कोकण शांत होणार नाही,” असे प्रमोद जठार यांनी म्हटले आहे.

दमानिया काय म्हणाल्या…

दमानिया यांनी ट्विटरवरुन जठार यांच्यावर निशाणा साधलाय. “नारायण राणेंच्या अटकेवर प्रमोद जठार म्हणाले “छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा संगमेश्वरला अटक झाली होती”? कुठे छत्रपती संभाजी महाराज आणि कुठे नारायण राणे…”, असा टोला दमानिया यांनी लगावला आहे. तसेच पुढे बोलताना दमानिया यांनी, “काहीही बोलायचं…. कहा राजा भोज और कहा गांगु तेली,” असं म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणेंना चांगलंच भोवलं आहे. नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नारायण राणेंना अटक कऱण्यासाठी पोलीस अधीक्षक पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र नंतर त्यांना अटक करुन गाडीतून नेण्यात आलं.

नारायण राणे यांना त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस रवाना झाले आहेत. यावेळी निलेश राणे आणि समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात होता. अखेर पोलिसांनी नारायण राणेंना संगमेश्वर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे.