देशात खेलरत्न पुरस्काराच्या नावावरून वाद सुरु असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं राजीव गांधी यांच्या नावाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याऱ्या संस्थांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. राजीव गांधी यांच्या स्मृती दिनी म्हणजेच २० ऑगस्टला हा पुरस्कार दिला जाणार आहे. माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

“माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणून सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे की, राज्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधीजी यांच्या नावाने आगामी वर्षीपासून दरवर्षी २० ऑगस्ट रोजी पुरस्कार दिला जाणार आहे.हा पुरस्कार स्वर्गीय श्री. राजीव जी यांच्या भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी कायमस्वरूपी आदरांजली असेल.”, असं ट्वीट सजेज पाटील यांनी केलं आहे.

amit shah in jalgaon during campaigning
भाजपचा अल्पसंख्यांकांना आरक्षण देण्यास विरोध; अमित शहा यांच्याकडून भूमिका जाहीर
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Ajit Pawar Jayant Patil x
Jayant Patil : “अरे बाप नाही, तुझा काकाच…”, जयंत पाटलांचं अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर
Challenge for Kiran Samant from Rajapur Assembly Election Constituency print politics news
लक्षवेधी लढत: राजापूर : उदय सामंत यांच्या भावासमोर कडवे आव्हान
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा

राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय ७ जुलै २०२१ रोजी घेतला आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.