आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे हे नाव गेल्या ५० वर्षांत सर्वश्रुत झालं आहे. बालाजी तांबेंच्या उपचार पद्धतींचा फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील आणि परदेशातील व्यक्तींना देखील फायदा झाला आहे. बालाजी तांबे यांचं मंगळवारी निधन झाल्यानंतर त्यावर सर्वच क्षेत्रातील व्यक्तींकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पण आयुर्वेदाचार्य या प्रस्थापर्यंत पोहोचण्याआधी बालाजी तांबे यांनी देखील लहानपणी कठोर मेहनत घेतल्याचं त्यांचा भूतकाळ सांगतो. त्यांनी स्वत:च आपल्या भूतकाळातली ही काही बंद झालेली पानं उलगडली आहेत. काही दिवसांपूर्वी एबीपी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या भूतकाळातील काही परिचित नसलेल्या गोष्टींना उजाळा दिला आहे.
भाजीमार्केटमध्ये पोमेड, साबण विकायचो!
आपल्या लहानपणीची आठवण सांगताना बालाजी तांबे म्हणाले, “आमच्याकडे मोठं भाजीमार्केट असायचं. ज्या दिवशी मला वेळ असेल किंवा शाळा नसेल अशा सुट्टीच्या दिवशी पोत्यावर दुकान टाकून त्या भाजी मार्केटमध्ये बसायचो. पोमेड, साबण विकायचो. एका एजन्सीकडून आम्ही वस्तू विकण्याचं काम घेतलं होतं. रविवारी त्याच वस्तू गळ्यात ट्रे अडकवून रस्तोरस्ती विकायचो”.
..आणि बालाजी तांबे मिश्किलपणे धिरूभाई अंबानींना म्हणाले, “तोपर्यंत तुमचे गुडघे राहिले तर बरं!”
…म्हणून बालाजी तांबे आयुर्वेदाकडे वळले!
दरम्यान, बालाजी तांबे यांनी आपण नेमके आयुर्वेदाकडे कसे वळलो, याची एक कहाणी सांगितली आहे. त्यांच्या जन्माच्याही आधी असलेला याविषयीचा संदर्भ त्यांनी स्पष्ट करून सांगितला आहे. “माझ्या बाबांचं ३६ व्या वर्षी लग्न झालं. तोपर्यंत ते बेडाघाटला एका गुरुंजवळ राहायचे. शास्त्र, योग, शक्तिपात शिकायला गेले होते. तेव्हा त्यांनी बाबांना सांगितलं, तू जा घरी, लग्न कर आणि तुझा पहिला मुलगा या कार्यासाठी मला झोळीत दे. त्यामुळे बाबाही मला लहानपणी म्हणायचे तुला हे असं काम करायचं आहे. मलाही उपजत काही समज होतीच”, असं ते म्हणाले.