केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या असतानाच समर्थकांनी राजीनामे दिले. त्यामुळी ही चर्चा अजून रंगली आहे. दिल्लीतून मुंबईत परत येताच राजीनामे दिलेल्या कार्यकर्त्यांशी पंकजा मुंडे यांनी संवाद साधला. संवाद साधत असताना पंकजा मुंडे यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नसला तरीही भाजपा नेतृत्वावरील त्यांची नाराजी लपून राहिली नाही. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाचा नेमका अर्थ काय आहे ते समजून घेऊयात.

एकीकडे पंकजा मुंडे, “मला दबावाचं राजकारण करायचं नाही, तुम्ही तुमच्या स्तरावर राजकारणात उभे राहा. कोणीही पक्ष सोडू नये. मी समाधानी आहे असं सांगतात पण दुसरीकडे मात्र पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करतात. विधानपरिषदेत तिकीट दिले नाही हे त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवलाय. तसंच वेळ आली तर कठोर निर्णयही घेऊ असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा..