विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीत भाजपाचे अमरिश पटेल यांचा विजय झाला. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचे अमरिश पटेल ३३२ मतांसह विजयी झाले. तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना केवळ ९८ मते मिळाली. १ डिसेंबरला या विभागात ९९ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आज मतमोजणीअंती भाजपाच्या उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवाराला मात दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारवर खरमरीत टीका केली.

विधान परिषद पोटनिवडणुकीच्या धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघात विजयी झालेल्या अमरिश पटेल यांचं अभिनंदन करणारं ट्विट प्रवीण दरेकर यांनी केलं. याच ट्विटमध्ये त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. “धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महाविकास आघाडी आपली ५० टक्केही मतं राखू शकलेली नाही. यावरून उद्याचे महाविकास आघाडीचे नक्की काय भविष्य असेल हे स्पष्ट होते”, असे टीका त्यांनी केली. तसेच, भाजपाचे उमेदवार अमरीश पटेल यांचे तसेच सर्व मतदारांचे त्यांनी अभिनंदन केले.

eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
cm eknath shinde supporters holding public meetings to create pressure on bjp for thane lok sabha seat
Lok Sabha Election 2024: भाजपवर दबावासाठी शिंदे सेनेच्या दंड बैठका
eknath shinde latest news in marathi, shrikant shinde marathi news
खासदारांच्या ‘कल्याणा’नंतरच मुलाची उमेदवारी, मुख्यमंत्री शिंदे यांची व्युहरचना
Nashik Lok Sabha
साहेब, जागा वाचवा… – नाशिकच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

आणखी वाचा- विधान परिषद पोटनिवडणूक: काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरिश पटेलांची काँग्रेसवर मात

अमरिश पटेल हे काँग्रेसमधून भाजपात आलेले उमेदवार होते. तर अभिजीत पाटील भाजपामधून काँग्रेसमध्ये गेलेले उमेदवार होते. त्यामुळे या निवडणुकीबाबत खूपच उत्सुकता होती. अमरिश पटेल यांनी विरोधकांची ११५ मते फोडण्यात यश मिळवले. या निवडणुकीसाठी भाजपाच्या १९९ तर महाविकास आघाडीच्या २१३ सदस्यांनी मतदान केले होते. त्यात काँग्रेसच्या ५०हून अधिक मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले. कारण काँग्रेसचे संख्याबळ १५७ असतानाही पाटील यांना केवळ ९८ मतेच मिळाली. तर, महाविकास आघाडीच्या अंदाजे ११५ मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले. कारण महाविकास आघाडीची एकत्रित मिळून एकूण २१३ मते होती पण अभिजीत पाटील यांना शंभरीही गाठता आली नाही.