आपल्या वर्तमान काळावर आपला भविष्य अवलंबून आहे. आपला छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आपण ही लढाई जिंकणारचं आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. कोणत्याही नागरिकानं घराबाहेर पडू नये, आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- सकाळी आलो असतो, तर छातीत धस्स झालं असतं – उद्धव ठाकरे

आज मी काहीही निगेटिव्ह बोलणार नाही. कालच्या निर्णयानंतर अनेकांची धावपळ झाली. त्यात मी आज सकाळी आलो असतो तर सर्वांना धस्स झालं असतं. म्हणून गुढी पाडव्याच्या शुभेच्छाही दुपारी देत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आज अनेक दिवसांनी सर्व कुटुंबीय एकत्र आले आहे. आपला शत्रू मोठा आहे. तो आपल्याला दिसत नाही. आपण घराबाहेर पडलो तर तो कधीही हल्ला करेल. आपण बाहेर पडलो तर तो आपल्या घरात येईल. त्यामुळे आपल्याला सर्वांची काळजी घेणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. आज घरातील अनेक जण एकत्र आलेत. आपण आजपर्यंत जे गमावलं होतं ते या निमित्तानं शक्य झालं आहे. याव्यतिरिक्त शक्यतो सर्व ठिकाणी एसी बंद करा असं केंद्राकडून सांगितलं आहे. परंतु आम्ही हे आधीच सुरू केलंय असं आपण त्यांना सांगितल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- करोना व्हायरस हा छुपा शत्रू, त्याला हरवण्याचा संकल्प करा : उद्धव ठाकरे

करोनाचा सामना करतानाच अनेक उद्योगांचे मालक आपल्याशी संपर्क करतात. आज सर्वजण आपल्याला मदत करतायत. रिलायन्सनंही आपल्याला रूग्णालयासाठी मदत केली. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी कंपन्या बंद ठेवल्या आहेत. परंतु यात कामगारांना किमान वेतन द्यावं. असं न झाल्यास ज्यांचं तळहातावर पोट आहे त्यांच्यासमोर संकट उभं राहिलं. आपल्यासमोरचं एक संकट जाईल दुसरं येईल, असं ते म्हणाले. राज्यात जीवनावश्यक वस्तूंची कमी पडू देणार नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या कामात अडथळा आणणार नाही. भाजीपाल्याचीही दुकानं बंद होणार नाहीत. त्यामुळे गर्दी करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.