काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शनिवारी (दि.३) मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. मात्र, शनिवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येते.

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ते आजारी असल्याचे सांगण्यात येते. सोशल मीडियावर कदम यांची प्रकृती बिघडल्याच्या पोस्ट व्हायरल होत होत्या. या सर्व प्रकारामुळे पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांसह हितचिंतकांमध्ये देखील अस्वस्थता पसरली होती. या पार्श्वभूमीवर विश्वजीत कदम यांनी प्रसिद्धपत्रक काढून पतंगराव कदम यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते लवकरच सर्वांच्या भेटीला येतील. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले आहे.