जगभरात थैमान घालणाऱ्या कोरना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात झपाट्याने वाढत आहे. नवी मुंबईतही सातत्याने करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून सोमवारी दिवसभरात  शहरात सर्वात अधिक १०५ करोनाबाधित सापडले आहेत. शहरात करोनाबाधितांची संख्या ७७९ झाली असून आज ४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनामुळे शहरातील मृतांचा एकूण आकडा १८ झाला आहे.

शहरात सोमवारी बेलापूरमध्ये ४,नेरुळमध्ये ८ तुर्भे ३४, वाशीत ४, कोपरखैरणेत ३०,घणसोलीत १६, ऐरोलीत ५, व दिघा येथे ४ अशी दिवसभरात १०५ रुग्णांची वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात १२३० नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर करोनाची लागण झाल्याने २४ तासात ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या २३ हजार ४०१ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन ८६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

Story img Loader