“अभिनेत्री कंगना रणौत जे काही म्हणाली, त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. भाजपाने सुद्धा याचा निषेध केला आहे. तुम्ही भले कंगना रणौतच्या मताशी सहमत नसाल पण प्रत्येक नागरिकांची सुरक्षा करणं ही राज्याची जबाबदारी आहे” असे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सोमवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.

आणखी वाचा- “अनेकजण इतर प्रांतातून महाराष्ट्रात येतात, काही ऋण मानतात काही मानत नाहीत”

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर केली होती. त्यामुळे तिच्यावर राजकीय तसेच कला क्षेत्रातून प्रचंड टीका करण्यात आली. कंगना रणौतचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबरोबर शाब्दिक वाद चांगलाचा रंगला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा- “मुंबईचा अपमान करणाऱ्या कंगनाला केंद्राने वाय दर्जाची सुरक्षा देणं धक्कादायक”

किरीट सोमय्या म्हणाले…

राज्याच्या गृहमंत्र्यांवर कंगना रणौतला धमकावल्याचा आरोप करीत हे आम्ही चालू देणार नाही, अशा शब्दांत भाजपा प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. सौमय्या म्हणाले, “कंगना रणौतने मुंबईबाबत विधान करीत चूक केली आहे. प्रत्येक मुंबईकर तिच्या या विधानाशी असहमत आहेत. त्यामुळे तिनं आपलं विधान मागं घ्यायलाच हवं, मात्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तिला धमकावणं हे आपण चालू देणार नाही.