राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद गोविंदराव येवले यांची औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यपाल विद्यासागर राव यांनी सोमवारी (दि. १५) डॉ. प्रमोद येवले यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी अथवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील, यापैकी जे अगोदर असेल, त्या दिवसापर्यंत करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ बी ए चोपडे  यांचा कार्यकाळ ३ जून २०१९ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.  कोल्हापूर येथील शिवाजी विदयापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांचेकडे डॉ. बाबासाहेब बेडकर मराठवाडाविद्यापीठाच्या  कुलगुरु पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

डॉ येवले यांनी औषधीनिर्माणशात्र विषयात पीएचडी प्राप्त केली असून, त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. जून २०१५ साली त्यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली होती. विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त  न्यायमुर्ती अनिल दवे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. नॅशनल इंस्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली या संस्थेचे संचालक प्रवीण कुमार तसेच शासनाचे प्रधान सचिव भूषण गगराणी हे या निवड समितीचे सदस्य होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr dr pramod yeoles dr babasaheb ambedkar appointed marathwada university vice chancellor msr