वसई: वृत्तवाहिन्यावर सातत्त्याने दाखवल्या जाणाऱ्या करोना च्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरत आहे. वसईत राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा अशाच भीतीने बळी गेला. करोना होऊन मारणार या भीतीने तिने कीटक नाशक पिऊन आत्महत्या केली. वसई पूर्वेच्या राजवली जवळील भोईदापाडा येथे ही १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहत होती. सध्या करोना मूळे सतत टीव्ही वर यासंदर्भातील बातम्या सुरू असतात. त्या बातम्या पाहून तिच्या मनात प्रचंड भीती बसली होती. सगळ्यांना करोना होणार आणि सगळे मारणार, असे तिला वाटत होते. अशी भीती तिने आपल्या वडिलांकडे देखील व्यक्त केली होती. त्याच भीतीपोटी तिने १८ एप्रिल रोजी घरात असलेले किटकनाशक प्राशन केले. तिला उपचारासाठी नालासोपारा येथील पालिकेच्या तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
करोनाच्या भीतीने मुलीची आत्महत्या
वसई पूर्वेच्या राजवली जवळील भोईदापाडा येथे ही १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहत होती.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 11-05-2020 at 23:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl commits suicide due to fear of coronavirus zws