प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या एका विधानावरून महाराष्ट्रात मोठा वाद उभा राहिला आहे. राजकीय नेत्यांसह अनेकांनी इंदुरीकर महाराज यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. तर दुसरीकडे इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थही लोक पुढे येत आहे. या वादावर संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी भाष्य केलं आहे. कीर्तन, प्रवचनाची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. त्यात इंदुरीकरांचं कीर्तन बसत नाही. त्याचबरोबर त्यांचे विनोदही कमी दर्जाचे असतात, अशी टीका केली आहे.

इंदुरीकर महाराज यांनी ओझर येथे झालेल्या किर्तनात “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,” असं ते म्हणाले होते. त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेतल्यानं वादाला तोंड फुटले. त्यानंतर राज्यभरातून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. राजकीय नेत्यांनी इंदुरीकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तर त्यांच्या समर्थकांनी आंदोलनाची हाकही दिली आहे. या वादात इंदुरीकर महाराजांच्या किर्तनांचा वादावर डॉ. सदानंद मोरे यांनी कठोर शब्दात समाचार घेतला आहे.

gulab puris controversial ganpati decoration
गुलाब पुरींच्या गणपतींच्या वादग्रस्त देखाव्याबाबत उत्सुकता
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
Satara, Ganesha welcome Satara, Satara latest news,
साताऱ्यात ‘मोरया’चा जयघोष, वाद्यांचा गजर; गणरायांचे उत्साहात स्वागत
Descriptions of Lord Ganesha by various sants
बुद्धिदेवता ओंकारब्रह्म
ladki bahin yojana shri ram mandir drug side effects topic in ganeshotsav themes
लाडकी बहीण योजना, श्रीराम मंदिर,अमली पदार्थांचे दुष्परिणाम; गणेशोत्सवातील देखाव्यांत वैविध्यपूर्ण विषयांची हाताळणी
gunratna sadavarte sharad pawar news
“एसटी कर्मचाऱ्याच्या संपात शरद पवार, उद्धव ठाकरेंची माणसं”; गुणरत्न सदावर्तेंचा आरोप; म्हणाले, “ज्या कृती समितीने…”
Rigveda manuscript page (Source_ Ms. Sarah Welch_Wikimedia Commons)
देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृती | वेदांचे महत्त्व आणि विधी
Dnyaneshwar, Ratnagiri, California,
रत्नागिरी कॅलिफोर्नियापेक्षाही सुंदर; समाजात ज्ञानेश्वरांबरोबर विज्ञानेश्वरही हवेत – ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर

काय म्हणाले डॉ. सदानंद मोरे?

“इंदोरीकरांवर चर्चा यापूर्वीच व्हायला हवी होती. कीर्तन, प्रवचनाची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. त्यात इंदोरीकरांचं कीर्तन बसत नाही. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकोबा यांचा तर आपण इंदोरीकरांसारखं कीर्तन करताना विचार करू शकत नाही.
मी गेली ५०-५५ वर्षे कीर्तन ऐकतो आहे. त्यामधे मामासाहेब दांडेकर व त्यांच्याही आधीच्या किर्तनकारांची किर्तनं ऐकली आहेत. पण अशाप्रकारचे विनोद पूर्वी कोणाच्याही किर्तनामध्ये नव्हते. ही लाट अलिकडेच आली आहे.
त्यांच्या किंवा काही इतर किर्तनकारांच्या नावामागे विनोदमूर्ती किंवा विनोदाचार्य असे लिहितात. विनोदाचार्य हे काही किर्तनकाराचे विशेषण नाही.
त्यांचे विनोद कीर्तनामध्ये तर शोभत नाहीतच, पण एकूण विनोद म्हणून सुद्धा ते कमी दर्जाचे आहेत. त्यामध्ये बहुतेकदा स्त्रियांना टार्गेट केले जाते. स्त्रियांवर होणारे हे विनोद व त्याला मिळणारी दाद हे आपली अभिरूची घसरल्याचे लक्षण आहे. मागे किर्तनसंमेलनात अध्यक्षपदावरून असेच मत व्यक्त केले होते,” अशा शब्दात त्यांनी सुनावलं आहे.

भाजपाही म्हणाली ते विधान चुकीचं –

“इंदुरीकर महाराजांची कीर्तनं जनप्रबोधनासाठी असतात. मात्र, इंदुरीकरांनी ‘ते’ विधान करायला नको होतं. इंदुरीकर महाराजांनी केलेलं ते विधान चुकीचंच आहे. त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. पण, भाजपा त्यांच्या पाठिंशी आहे. एका वाक्यानं व्यक्ती खराब होत नाही. एका वाक्यानं माणसाची तपश्चर्या घालवू नका,” असं आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.