गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांसमोर सध्या ‘प्रतीक्षा यादी’चा यक्षप्रश्न उभा आहे. मात्र मध्य रेल्वेने हा प्रश्न सोडवण्यासाठीया गाडय़ांना जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सध्या प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांपैकी काहींना तरी कोकणातील आपल्या घरच्या गणपतीला पोहोचता येणार आहे. त्याशिवाय मध्य रेल्वेने यंदा विक्रमी फेऱ्याही सोडल्या आहेत. हे डबे जोडल्याने १०८९ आरक्षित आणि ६४८० अनारक्षित प्रवाशांचा कोकणात जाण्याचा मार्ग सुकर होणार आहे. १२१३३ डाउन छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मंगलोर जंक्शन या गाडीच्या सध्याच्या डब्यांबरोबच ५ ते ८ सप्टेंबर या चार दिवसांत वातानुकुलित टू टायर आणि वातानुकुलित थ्री टायर असे दोन जादा डबे जोडण्यात येतील. १२०५१ डाउन दादर-मडगांव जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीला ५ ते ११ सप्टेंबरदरम्यान द्वितीय श्रेणीचे दोन डबे जोडले जातील. यंदा कोकणात सोडण्यात येणाऱ्या ०१०३३ डाउन छत्रपती शिवाजी टर्मिनस-मडगाव या विशेष गाडीलाही १ वातानुकुलित थ्री टियर डबा जोडला जाईल. हा डबा ७ सप्टेंबर रोजी जोडला जाणार आहे. तसेच याच दिवशी दादरहून पेडण्याला जाणाऱ्या ०१०४१ डाउन या गाडीलाही एक वातानुकुलित थ्री टायर डबा जोडण्यात येणार आहे. ११००३ डाउन दादर-सावंतवाडी एक्सप्रेस ही गाडी ५ ते २२ सप्टेंबर या दरम्यान चार अतिरिक्त द्वितीय श्रेणींच्या डब्यांसह धावणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा