करोनाचा वाढता संसर्ग, दिवसेंदिवस रुग्णसंख्येत पडत चाललेली भर आणि मृत्यूचं थैमान, यामुळे राज्य सरकारची सध्या झोप उडाली आहे. विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले. हे निर्बंध पुन्हा १५ दिवसांसाठी वाढविण्यात आले आहेत. वाढविलेले निर्बंध आणि निर्बंध घोषित करताना केलेल्या घोषणा यावरून भाजपाने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत राज्य सरकारच्या कडक निर्बंध वाढविण्याच्या निर्णयावर टीकास्त्र डागलं आहे. त्याचबरोबर काही सवालही उपस्थित केले आहेत. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी सांगा जगायचं कस? १४ एप्रिलपासून संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केला त्यावेळी जे पॅकेज जाहीर केले त्याचे काय झाले सांगा. आता आणखी पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवला आहे, सामान्यांनी कसे जगायचे सांगा?,” असा सवाल उपाध्ये यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केला आहे.
आणखी वाचा- “आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का?”
मुख्यमंत्री @OfficeofUT जी सांगा गरिबांनी जगायचं कस? 14 एप्रिलपासून संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केला त्यावेळी जे पॅकेज जाहीर केले त्याचे काय झाले सांगा. आता आणखी पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवला आहे, सामान्यांनी कसे जगायचे सांगा…१
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 30, 2021
“५ लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी १५०० रुपये, तर १२ लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी १५०० रुपये देण्याचे जाहीर केले होते. कितीजणांना प्रत्यक्ष मदत दिली सांगा. अपयश झाकायला कांगावा वअकांडतांडव पण जनतेला मदत करायचे म्हणल्यावर हे सरकार कोडगे बनते. दुर्बल घटकांना मदत करायची सरकारची इच्छाच नाही,” असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला आहे.
५ लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी 1500 रुपये तर 12 लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी 1500 रु देण्याचे जाहीर केले होते. कितीजणांना प्रत्यक्ष मदत दिली सांगा.
अपयश झाकायला कांगावा वअकांडतांडव पण जनतेला मदत करायचे म्हणल्यावर हे सरकार कोडगे बनते. दुर्बल घटकांना मदत करायची सरकारचीइच्छाच नाही..३— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 30, 2021
“संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाउन लागू केलेल्या निर्णयाला आज १५ दिवस उलटले, तरी आधीच तुटपुंजी जाहीर केलेली मदत ही या वसुली सरकारला लाभार्थ्यांना देता आलेली नाहीये,” असं म्हणत उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू करण्याची घोषणा केल्यानंतर मदत देण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर शिवभोजन थाळीही महिनाभर मोफत देणार असल्याचं जाहीर केलं होत.