गेल्या चार दिवसापासून अहमदनगर शहरात सुरु असलेल्या अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘निरुपण’ (रंगपंढरी, पुणे) व ‘ब्रह्मास्त्र’ (महर्षी दयानंद विद्यालय, मुंबई) या एकांकिकांनी प्रथम क्रमांकाचा महाकरंडक पटकावला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अभिनेत्री मुक्ता बर्वे, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, कलावंत मोहिनीराज गटणे, उद्योजक नरेंद्र फिरोदिया आदींच्या उपस्थितीत झाले.
यावेळी मुक्ता बर्वे म्हणाल्या की, “स्पर्धेत सर्वच कलाकारांनी जीव ओतून काम केले. एकांकिकांचे विषय पाहून पुन्हा नाटकात काम करण्याची इच्छा निर्माण झाली. फिरोदिया परिवार नगरच्या कलाकारांच्या पाठीशी उभा रहात असल्याने नगरच्या कलाकारांना उज्वल भविष्य असेल यात शंका नाही.” आ. जगताप यांनी, नगरवरील प्रेमापोटी फिरोदिया परिवार आयोजित करत असलेल्या अहमदनगर महाकरंडक स्पर्धेमुळे समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केल्याकडे लक्ष वेधले. नरेंद्र फिरोदिया यांनी वाढता प्रतिसाद पाहता महावीर प्रतिष्ठान व ‘आय लव्ह नगर’च्या सहकार्याने पुढील वर्षी आठ दिवस स्पर्धेचे नियोजन करणार असल्याची माहिती दिली.
स्पर्धेचा निकाल –
(प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमाने) लेखन- राजरत्न भोजने, ईश्वर अंधारे व पराग फडके, रंगभूषा-गायत्री चक्रदेव, जॉय भांबळ. वेशभूषा- गायत्री चक्रदेव व शुभांगी सूर्यवंशी. प्रकाश योजना- शाम चव्हाण, निखिल मारणे व शर्वरी लहाडे, संगीत- हर्श विजय, गायत्री चक्रदेव व वैभव रंधवे. नेपथ्य- उज्ज्वल काणसकर, केतन दूधवडकर व सिद्धेश नांदलस्कर. विनोदी कलाकार- धीरज कांबळे, हार्दिक सुतार. अभिनेता- रोहन सुर्वे, प्रमोद पुजारी व सागर शिंदे. अभिनेत्री- भाग्य नायर व आरती बिराजदार, श्वेता पारखे व कोमल वजारे. सहाय्यक अभिनेता- प्रसन्न मानगावकर, प्रद्युम्न गायकवाड. सहाय्यक अभिनेत्री- सीमा निकम, नुपूर राणे. दिग्दर्शन- रोहित मोहिते, रोहित कोतेकर, शर्वरी लहाडे व रोहित, नीलेश, प्रशांत. सर्वोत्कृष्ट एकांकिका- निरुपण (रंगपंढरी, पुणे ) व ब्रह्मास्त्र (महर्षी दयानंद महाविद्यालय, मुंबई), ए बास्टर्ड पॅट्रिअट (दिशा थिएटर्स आणि ओंकार प्रोडक्शन, मुंबई), मोठा पाऊस आला आणि.. (रंगयात्रा, इचलकरंजी) व इट हॅपन्स (गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर).