महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प मांडला. ठाकरे सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पामध्ये नाट्यसंमेलनाच्या निधीत वाढ करण्यात आल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडत असताना नाट्यसंमेलनाच्या निधीत वाढ करण्यात आल्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. या निर्णयानुसार आता नाट्यसंमेलनासाठी १० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

आणखी वाचा- Maharashtra Budget 2020 : अर्थसंकल्पात क्रीडा विभागासाठी काय?

नाट्यसंमेलनाच्या निधीत वाढ करण्यासोबतच मुंबईत मराठी भवन बांधणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. तसंच वडाळ्यात मुंबईत वस्तू आणि सेवा कर केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी १४८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच पुणे जागतिक चित्रपट महोत्सवासाठी ४ कोटी आणि सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित ठेवून ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

आणखी वाचा- “राज्यात स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के आरक्षण देणार”; अजित पवारांची घोषणा

दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. यामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. तसंच क्रीडा, शाळा या क्षेत्रांसाठीही विशेष तरतुदी असल्याचं दिसून येत आहे.