करोनामुळे अनेक परीक्षांच्या तारखांचा गोंधळ उडालेला आपण पाहत आहोत. काही परीक्षा तर घेयच्या की नाही, परीक्षा होणार असतील तर त्या कोणत्या पद्धतीने घेयच्या इथं पासून सुरुवात आहे. ज्या परीक्षा होणार आहेत त्यांच्या तारखांचा गोंधळ तर सातत्याने होतचं आहे. एक तारीख जाहीर करून पुन्हा ती बदलली जात आहे. अशातच आता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत तर्फे घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेची तारीख आधी ८ ऑगस्ट होती. ही तारीख एक दिवसाने पुढे ढकलून ९ ऑगस्ट करण्यात आली होती. आता या तारखेतही बदल करण्यात आला आहे.

कधी होणार परीक्षा?

करोना परिस्थितीमुळे आता महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा ही १२ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. सर्वसाधारणपणे दरवर्षी पाचवी आणि आठवीच्या वर्गात शिकणारे सुमारे १० लाखांहुन अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करतात. परंतु या वर्षी या संख्येत कमालीची घट झाली आहे. यंदा राज्यातील ४७ हजार ६१२ शाळांमधील ६ लाख ३२ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरला आहे. यामध्ये पाचवीच्या वर्गातील ३ लाख ८८ हजार ३३५ विद्यार्थी आहेत तर आठवीच्या वर्गातील २ लाख ४४ हजार १४३ विद्यार्थी आहेत.

का बदलली तारीख?

आधी ९ ऑगस्टला परीक्षा होणार असल्याने परीक्षा परिषदेकडून पूर्ण तयारी करण्यात आली होती. पण ९ ऑगस्टला ‘जागतिक अधिवासी दिन’ असल्याने काही आदिवासी संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. म्हणूनच पुन्हा एकदा परीक्षेची तारीख बदलत १२ ऑगस्ट ही ठरवण्यात आली आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त शैलजा दराडे यांनी पत्र जारी करत माहिती दिली आहे. या आधी परीक्षा २५ एप्रिलला होणार असं जाहीर करण्यात आलं होत. पुन्हा ती तारीख बदलून २३ मे नंतर २१ जून झाल्या. पण पुन्हा एकदा तारीख बदलून ८ ऑगस्ट निश्चित करण्यात आली होती. पण त्या दिवशी सेंट्रलं आर्म पोलीस फोर्स पदाची परीक्षा होती म्हणून तारीख एक दिवसाने पुढे ढकलण्यात आली होती.