गोपाळराव देशमुखांच्या संशोधन ग्रंथातून नवा प्रकाश

अठराव्या शतकात जवळपास पन्नास वर्षे विलक्षण पराक्रमाने, अनोख्या मुत्सद्दीगिरीने संपूर्ण देशाच्या इतिहासात तळपणारे मल्हारराव होळकर यांच्यावर झालेले संशोधनपर लेखन अपुरे आहे. पानिपतच्या युद्धातून मल्हाररावांनी पळ काढला, हा काही इतिहास संशोधकांनी घेतलेला आक्षेप चुकीचा आहे. खरेतर त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा राजस्थान व पंजाबसारख्या वीरांच्या भूमीतही उमटविला होता. संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवण्याची किमयाही मल्हारराव होळकरांनी साधली होती. पंढरपूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख यानी यासंदर्भात केलेल्या संशोधनातून मल्हारराव होळकरांच्या या अद्भुत पराक्रमावर प्रकाश पडला आहे.

Nizam, Razakars, and Operation Polo
Operation Polo: भारतासाठी महत्त्वाचे ठरलेले ‘ऑपरेशन पोलो’ काय होते?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
Dharavi Redevelopment Dharavi Adani Small and Micro Enterprises
धारावीच्या पुनर्विकासाचे मृगजळ

८२ वर्षांंच्या गोपाळराव देशमुख यांनी मल्हारराव होळकरांच्या कार्यकर्तृत्वावर अभ्यासपूर्ण आणि परिश्रमपूर्वक संशोधन करीत ‘सुभेदार मल्हारराव होळकर-एक राष्ट्रपुरूष’ हा ग्रंथ लिहिला आहे. कौसल्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या या संशोधन ग्रंथाचे प्रकाशन सोमवारी (दि. ३ जुलै) जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते सोलापुरात होत आहे.

अठराव्या शतकात उत्तरेतील मोगलांची सत्ता खिळखिळी झाल्याचे पाहून पेशव्यांनी मराठय़ांच्या पराक्रमाला उत्तरेकडे भरपूर वाव असल्याचे ओळखले आणि मल्हारराव होळकरांसह राणोजी शिंदे यासारख्या पराक्रमी सहकाऱ्यांना पाठविले. त्यातूनच मराठय़ांनी माळवा प्रांत व्यापून टाकत दिल्लीच्या मोगल बादशाहाचे सुभेदार दयाबहाद्दूर व बंगश तसेच जयपूर नरेश सवाई जयसिंग यांना नामोहरम केले. पेशव्यांनी मल्हाररावांच्या पराक्रमावर प्रभावित होऊन त्यांना इंदूरची जहागिरी दिली. मल्हाररावांचा पराक्रम पाहून राजस्थानातील राजेरजवाडे त्यांचे आपापसातील हेवेदावे, राजकीय वारसदारांचे तंटे आणि वैमनस्य सोडविण्यासाठी मल्हारराव होळकरांची मदत घेऊ लागले. मल्हाररावांनीही जयपूर, बुंदी यांसारख्या मोठय़ा राजघराण्यातील वादात न्यायदानाचे काम केले.

बुंदीच्या राजघराण्यात ज्याचा हक्क होता, त्या उम्मेदसिंहास पुन्हा बुंदीची गादी मिळवून दिली. त्यासाठी मल्हाररावांना बुंदीवर हल्ला करावा लागला. उम्मेदसिंहास गादी मिळाल्यानंतर तेथील राणीने मल्हाररावांना राखी बांधून भावासमान मान दिला. जयपूरच्या गादीचा तंटा निर्माण झाला तेव्हा तेथील खरा वारसदार माधोसिंग असूनही त्यास परागंदा होऊन आजोळी उदयपूरच्या मामाकडे आश्रय घ्यावा लागला होता. मल्हाररावांनी पेशव्यांकडे लेखी हमी देऊन ईश्वरसिंगाऐवजची माधोसिंगाची बाजू घेण्यास प्रवृत्त केले व त्यानुसार माधोसिंगाला जयपूरची गादी मिळवून दिली. म्हणून राजस्थानच्या इतिहासकारांनी मल्हारावांना ‘राज्य संस्थापक’ म्हटले आहे. मराठय़ांच्या इतिहासातील हा दुर्मीळ प्रसंग होय. वसईच्या मोहिमेत चिमाजी आप्पासोबत मल्हारराव होळकर होते. मल्हाररावानी ‘मातब्बर’ सुरूंग लावल्यामुळेच वसई किल्ल्याचा ‘सॅबॅशियन’ बुरूज ढासळला आणि मराठा सैन्याला किल्ल्यात शिरकाव करता आला. पोर्तिगिजांच्या ताब्यातून वसई मराठय़ांकडे आल्यामुळे इंग्रजही धास्तावले होते.

१७६१ च्या पानिपत युद्धातून मल्हारराव होळकरांनी पळ काढल्याचा आक्षेप काही इतिहास संशोधक घेतात. हा आक्षेप देशमुख यांनी साधार खोडून काढला आहे, उलट, पानिपत युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांनी संपूर्ण हिंदुस्थानाचा ‘एख्तियार’ मल्हाररावांकडे दिला होता. त्यांनी अहमदशाह अब्दालीस मदत करणारे सुजाऊद्दौला, जयपूर नरेश माधोसिंग व नजीबखान रोहिल्यासह उत्तरेकडील सर्वानाच निष्प्रभ करूरन सोडले. त्यामुळेच अब्दाली हिंदुस्थानच्या वाटेवर मल्हाररावांच्या हयातीत पुन्हा पाऊल टाकण्यास तयार झाला नाही. अब्दाली पंजाबपासूनच माघारी फिरला. ‘मराठे मेले नाहीत’ अशी सर्व हिंदुस्थानची खात्री पटली ती मल्हाररावांच्या पराक्रमामुळेच.