राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एका ऐरणीवर आला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाकडून ठाकरे सरकारची कोंडी केली जात असल्याचं दिसत आहे. आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचा दावा भाजपाकडून केला जात असून, राज्यातील सत्ताधारी पक्ष हे केंद्राच्या अधिकारात असल्याचं सांगत आहेत. तर दुसरीकडे भाजपाकडूनच मराठा आरक्षणाला विरोध केला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी काही कागदपत्रे ट्विट केली असून, #SaveMeritSaveNation भाजपा व संघाशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. यावरून सावंत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही सवाल केला आहे.

मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालाय रद्द केला. त्यानंतर राज्यात राजकीय वादाची ठिणगी पडली. राज्य सरकारने नीट बाजू मांडली नसल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला. तर आरक्षण रद्द व्हावं म्हणून भाजपाकडून प्रयत्न केले गेले, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. यावरून आता वाद रंगला असून, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी Save Merit Save Nation संघटना भाजपाशी आणि संघाशी संबंधित असल्याचं गौप्यस्फोट केला आहे.

nagpur, Anurag Thakur, Criticizes Congress, india alliance leaders no trust, no trust on rahul gandhi, rahul gandhi s leadership, bjp, lok sabha 2024, nda, election 2024,
“राहुल गांधींवर जनतेचा विश्वास नाही,” अनुराग ठाकूर यांची टीका; म्हणाले, “काँग्रेसमध्ये…”
gadchiroli mahavikas aghadi dispute marathi news
गडचिरोलीत महाविकास आघाडीत अंतर्गत कलह; काँग्रेसच्या एककल्ली कारभारावर निष्ठावंतांसह मित्र पक्षांची नाराजी
Uday Samant, Accused, Congress, Defaming Women, in Party, Claims, Rashmi Barve, Nomination Form, Would be Cancelled, ramtek, lok sabha 2024, maharashtra politics, shinde shiv sena group, marathi news,
“रश्मी बर्वे यांना उमेदवारी देणे हे काँग्रेसचे षडयंत्र,” उदय सामंत यांचा आरोप; म्हणाले, “काँग्रेस महिलांवर अन्याय..”
nana patole Uddhav Thackeray
“शरद पवारांनी काँग्रेस आणि ठाकरे गटात भांडण लावलं”, शिवसेना आमदाराचं वक्तव्य; म्हणाले, “त्या खेळीत उबाठा गट फसला”

आणखी वाचा- “राजे, आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका, मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही”

सचिन सावंत यांनी सेव्ह मेरीट सेव्ह नेशन संघटनेचे मूळ संस्थापक डॉ. अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी असल्याचे कागदपत्रे ट्विट केली आहेत. “मराठा आरक्षणाला निकराने विरोध करणाऱ्या Save Merit Save Nation संघटनेचे मूळ संस्थापक ज्यांनी स्वतःचा पत्त्यावर ही संस्था स्थापन केली, ते डॉ अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी कसे? महाराष्ट्र भाजपाने उत्तर द्यावे. चंद्रकांत पाटीलजी, ही भाजपा ची मराठा समाजाशी गद्दारी नाही का?,” असा संतप्त सवाल सावंत यांनी केला आहे.

“डॉ. अनुप मरार व इतर संघाशी संबंधित या संस्थेचे विश्वस्त नागपुरात मराठा आरक्षणाविरोधात मोर्चे काढत होते, तेव्हा भाजपा गप्प का होती? न्यायालयात हे लोक मराठा आरक्षणाला विरोध करत होते, तेव्हा भाजपा गप्प का होती? हे मूक समर्थन होते का? मागून पाठिंबा दिला का? महाराष्ट्र भाजपाने उत्तर द्यावे,” असं आव्हान सावंत यांनी दिलं आहे.

आणखी वाचा- मराठा आरक्षण : विशेष अधिवेशनाच्या मागणीसाठी कोल्हापुरात सर्वपक्षीय धरणे आंदोलन!

“भाजपानेच मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवून महाराष्ट्राशी दगाबाजी केली? मराठा आरक्षणविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या #SaveMeritSaveNation या संस्थेचे भाजपा व संघाचे नागपूर कनेक्शन आहे. भाजपा पदाधिकारी मराठा आरक्षणविरोधामध्ये न्यायालयीन लढाईत सहभागी होते,” असा आरोप करत सावंत यांनी भाजपावर प्रहार केला आहे.