पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूरमध्ये सदनिका

 पुणे :   महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यंमधील तीन हजार १३९ सदनिका आणि २९ भूखंडांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. १९ मे पासून अर्जप्रक्रियेला सुरुवात होणार आहे, तर ३० जून रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. सर्वात जास्त सदनिका पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीत आहेत.

‘म्हाडा’च्या पुणे विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी या सदनिका आणि भूखंड आहेत. १८ जून रोजी रात्री १२ नंतर अर्जासाठी नोंदणी बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक काकडे यांनी दिली. अत्यल्प गटासाठी पाच हजार रुपये, अल्प गटासाठी दहा हजार, मध्यम गटासाठी १५ हजार आणि उच्च उत्पन्न गटासाठी २० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. अनामत रक्कम ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आरटीजीएस आणि एनईएफटी याद्वारे भरता येणार आहे. ऑनलाइन अर्ज ‘लॉटरी डॉट म्हाडा डॉट जीओव्ही डॉट इन’या संकेतस्थळावरून स्वीकारले जाणार आहेत. नांदेडसिटी १०८०, रावेत आणि पुनावळे १२०, वाकड  २२, चिखली २६८, चऱ्होली वडमुखवाडी २१४, डुडुळगाव मोशी २३९, येवलेवाडी ८०, कात्रज २९ आणि धानोरी ५१ अशी पुण्यातील सदनिकांची  संख्या आहे.

Story img Loader