नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस अकादमीतील विविध उपक्रमांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमी परिसरातील नवनिर्मित इनडोअर कपोझिट फायरिंग रेंज, सिंथेटीक ट्रॅक, अस्ट्रोटर्फ फुटबॉल मैदान, ॲस्ट्रोटर्फ हॉकी मैदान, सिंथेटीक टॉपिंग बास्केटबॉल व व्हॉलिबॉल मैदान तसेच निसर्ग उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी उपस्थित मान्यवरांसह या सर्व प्रकल्पांची माहिती घेतली.यावेळी त्यांच्यासोबत मंत्री छगन भुजबळ,पर्यावरण आदित्य ठाकरें यांच्यासह डझनभर मंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यादाच नाशिक शहरात आले होते. यावेळी व्यासपीठावरुन छगन भुजबळ यांनी हॉकीस्टीकच्या संदर्भात व्यक्तव्य केलं. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं.

व्यासपीठावर मंत्री छगन भुजबळ भाषण करण्यासाठी उभे राहिले. तेव्हा त्यांनी हॉकीचा संदर्भ देत शिवसेनेशी जोडलं. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला विचारलं, हॉकी खेळलात का?, मी त्यांना सांगितलं मी हॉकी खेळलो नाही. पण शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो, तेव्हा खूप हॉकीस्टीक असायच्या माझ्याकडे..”, या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं.

अविनाश भोसले यांची चार कोटींची संपत्ती जप्त; ईडीची पुन्हा एकदा कारवाई

“भुजबळ साहेब सरकारमध्ये आलो की हॉकीस्टीक वापरामध्ये बदल होतो. सरकारमध्ये आल्यानंतर तीच हॉकी स्टीक व्यवस्थित वापरावी लागते.”, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांना काढला.