राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिल्लीत भेट घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आभार मानले आहेत. पुणे-शिरुर दरम्यान दुमजली पुलाचा एलिव्हेटेड कॉरीडॉर (६७ कि.मी) व चाकण-शिक्रापूर चौपदरीकरणासाठी काम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने निधी मंजूर केला आहे. यामुळे शिरुरमधील नगर रस्त्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे. यानिमित्ताने अमोल कोल्हे यांनी गडकरींची भेट घेऊन आभार मानले. अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

अमोल कोल्हे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. केंद्र सरकारने पुणे शिरुर रस्त्यावर दुमजली फ्लायओव्हर व तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता चौपदरीकरण यासाठी एकूण ८ हजार २१५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. याबद्दल त्यांचे शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या वतीने आभार मानले”.

Jayant Patil on Amit Shah
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका
Shivsena, NCP, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची फरफट, नाराजीची पटोलेंकडून कबुली
Rohit Pawars allegations against Eknath Khadse
रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’
maval lok sabha
अखेर मावळमधून शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर

याआधी अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत आपल्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील नगर रस्त्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघत आहे अशी माहिती दिली होती.

“या रस्त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहीते पाटील व शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड.अशोकबापू पवार यांच्यासोबत सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून लोकसभा निवडणूकीच्या काळात जनतेला दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल पडले याचा आनंद आहे,” असंही ते म्हणाले होते.