भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसी राजकीय आरक्षणासाठी संपूर्ण राज्यभरात रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे. कोल्हापूर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मध्यवर्ती बसस्थानकाजवळील दाभोळकर कॉर्नर या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

“ओबीसींचं राजकीय आरक्षण जर परत आणू शकलो नाही, तर राजकीय संन्यास घेईन”

यावेळी, सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. याप्रश्नी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार या ओबीसी नेत्यांशी कुठेही चर्चा करण्याची तयारी असल्याचे आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.

OBC reservation : भाजपा कार्यकर्ते आक्रमक; एक तास पुणे-मुंबई महामार्ग रोखला!

तसेच, चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपांप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला आहे, असे सांगत, परमबीर सिंह यांच्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकशी अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली.