करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सध्या देश लॉकडाउन आहे. करोनाचा महाराष्ट्रालाही फटका बसला आहे. या संकटामुळे लॉकडाऊन झालेल्या जनतेला राज्यातील महाविकास आघाडी सरकार दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडी सरकारने हातावर पोट असलेल्या आणि गरीब गरजुंसाठी अन्नधान्याच्या विविध योजना हाती घेतल्या आहेत. मात्र केशरी रेशन कार्डधारकांचाही राज्य सरकारने योग्य तो विचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. या संबधी आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या काळात गरीब नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. तशातच केशरी रेशन कार्डधारक आणि गरीब व गरजुंना अन्नधान्याचा तुटवडा भासू नये यासाठी त्यांच्याही योग्य तो विचार राज्य सरकारने करायला हवा, अशी मागणी शरद पवार यांनी केली होती. त्यानंतर करोनाच्या पार्श्वभूमीवर केशरी रेशनकार्डधारकांना रेशनचे धान्य मिळण्याबाबत, तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाने गरीब व गरजुंसाठी काय उपाययोजना केल्या आहेत, याबाबत माहिती देण्याच्या उद्देशाने भुजबळ यांनी मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. लॉकडाउन परिस्थितीत केशरी रेशन कार्डधारक तसेच समाजातील गरीब घटकांना योग्य अन्न-धान्य पुरवठा करण्यासंबंधी महाराष्ट्र सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत, याबाबत भुजबळ यांनी शरद पवार यांना माहिती दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केसरी रेशनकार्डधारकांना रेशनचे धान्य मिळावे त्यासोबतच अन्न व नागरी पुरवठा विभागाने केलेल्या उपाययोजनांबाबत @PawarSpeaks साहेब यांच्याशी मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.@NCPspeaks @CMOMaharashtra pic.twitter.com/aWiPOi3m8y
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) April 4, 2020
—
.#coronavirus #Lockdown परिस्थितीत केशरी रेशन कार्डधारक तसेच समाजातील गरीब घटकांना योग्य अन्न-धान्य पुरवठा करण्यासंबंधी महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या सिद्धतेची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. @ChhaganCBhujbal यांनी खा. @PawarSpeaks यांना आज प्रत्यक्ष भेटून दिली. pic.twitter.com/7yCzcCQyQe
— NCP (@NCPspeaks) April 4, 2020
दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत एकही गरीब उपाशी राहू नये यासाठी केंद्र सरकारने देखील व्यवस्था केल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे दोन प्रमुख भाग करण्यात आले आहेत. पहिल्या भागात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत ८० कोटी गरिबांना कवच मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पुढील तीन महिन्यांपर्यंत गरिबांना ५ किलो अतिरिक्त गहू किंवा तांदूळ मोफत मिळणार आहे. याचा फायदा ८० कोटी लोकांना होणार आहे. याशिवाय एक किलो डाळ मोफत मिळणार आहे.
योजनेअंतर्गत आठ विभागांमध्ये शेतकरी, मनरेगा, गरीब विधवा-निवृत्त कर्मचारी-दिव्यांग, जनधन योजना-उज्ज्वला योजना, सेल्फ हेल्प ग्रुप (महिला), ऑर्गनाइज्ड सेक्टर वर्कर्स (EPFO),कन्स्ट्रक्शन वर्कर्स यांना डीबीटीला फायदा मिळणार आहे. वयोवृद्ध, दिव्यांग आणि विधवांना पुढील तीन महिन्यात १००० रुपये दोन हफ्त्यात दिले जाणार आहेत.