पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन राज्यात सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. एकीकडे भाजपा संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने मात्र जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोवर कारवाई न करण्याची भूमिका घेतली आहे. भाजपाने पूजा चव्हाणचा मुद्दा आक्रमकतेने मांडत असताना तिच्या वडिलांनी मात्र अनेक गंभीर आरोप केले आहेत. पूजा तीन वर्ष भाजपा कार्यकर्ता होती असा गौप्यस्फोट त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

“पूजावर खूप ताण होता. तिच्या डोक्यावरील कर्ज वाढलं होतं. पोल्ट्री फार्मसाठी तिने कर्ज घेतलं होतं, यामध्ये तिचं खूप मोठं नुकसान झालं होतं. यामध्ये काही होणार नाही म्हणून आपण पुण्याला जाऊन दुसरं काही तरी करते असं ती म्हणाली होती,” अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे.

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
Narendra Modi at rbi event
“मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन

पूजा चव्हाण प्रकरण: अजित पवारांनी मांडली संजय राठोड यांची बाजू; म्हणाले…

“आत्महत्या केली त्यादिवशी दुपारी २ वाजता माझं तिच्याशी बोलणं झालं होतं. पैसे वैगेरे हवं का असं विचारलं होतं, त्यावर ती नको म्हणाली होती,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

पूजा प्रकरणात अनेक नावं येत असून त्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “हे सगळं चुकीचं आहे. कोणी कोणाचं नाव जोडून काहीतरी सांगत आहे. हे सगळं थांबलं पाहिजे. पोलिसांचा तपास सुरु असताना विनाकारण आरोप कशासाठी करत आहात? माझी मुलगी गेली आहे त्यात हे ऐकून वाईट वाटतं. बदनामी थांबवा असं आवाहन केल्यानंतरही बदनामी सुरु आहे हे थांबलं पाहिजे”. पूजा प्रकरणाशी अरुण राठोड नाव जोडणंही चुकीचं असून, त्याचा काहीच संबंध नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

आणखी वाचा- “पूजावर खूप ताण होता”; वडिलांनी प्रथमच केला खुलासा

दरम्यान मंत्र्यांचं नाव जोडलं जात असल्याच्या प्रश्नावर त्यांनी सांगितलं की, “मंत्री असो किंवा कोणीही असो तपासाअंती नाव आलं तर कारवाई होईलच. पण सध्या कोणाचं नाव घेऊ शकत नाही”. पुढे त्यांनी सांगितलं की, “पूजाने तीन वर्ष भाजपासाठी काम केलं. तिथं कोणी काही विचारत नव्हतं. काय झालं नेमकं मला माहिती नाही”.

“नुसती बदनामी सुरु आहे, पण साधा मला कोणी फोनही केला नाही. भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना सर्वांसोबत तिचे फोटो आहेत. पण कोणीही चौकशीसाठी फोन केला नाही. फक्त बदनामी सुरु आहे. सर्वांना सत्य समोर आल्यावर बोललं पाहिजे,” अशी विनंती त्यांनी केली आहे. .