साताऱ्यात उदयनराजे समर्थकांनी फाईट या सिनेमाच्या प्रमोशनसाठी लावण्यात आलेल्या गाडीची तोडफोड केली आहे. ‘साताऱ्यात फक्त मीच चालणार’ या वाक्याला आक्षेप घेत ही तोडफोड करण्यात आली. साताऱ्यातील राधिका पॅलेस या ठिकाणी फाईट नावाच्या सिनेमाची पत्रकार परिषद सुरु होती. त्याचवेळी ही तोडफोडीची घटना घडली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. हा सिनेमा उदयनराजेंच्या विरोधातला नाही. आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला आहे, मात्र जो प्रकार घडला तो गैर आहे अशी प्रतिक्रिया चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी दिली आहे.
तर दुसरीकडे फाईट या सिनेमातला साताऱ्यात फक्त मीच चालणार हा संवाद असल्याचे पाहून कपाळाला हात मारून घेतल्याचा व्हिडीओही व्हायरल होतो आहे. उदयनराजे हे एका कारमध्ये हा व्हिडीओ पाहात असल्याचे स्पष्ट होते आहे. साताऱ्यात इतर कोणाचेही काहीही चालत नाही फक्त उदयनराजेच चालतात. त्यामुळे तुम्ही हा डायलॉग सिनेमातून काढून टाका असे म्हणत ही उदयनराजे समर्थकांनी ही तोडफोड केली आहे.