भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाला लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी एका निवेदनाद्वारे संघटनेची भूमिका मांडली. समाजात काही घटक जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा शक्तींना बळी पडू नका, शांतता राखा, असे आवाहन त्यांनी केले. भीमा कोरेगावाचा हिंसाचार आणि त्यानंतर मुंबई, पुण्यासह त्याचे राज्यभरात उमटलेले पडसाद ही खूप दु:खद बाब आहे. भीमा कोरेगावमध्ये जो काही प्रकार घडला तो निंदाजनक असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा तीव्र निषेध करत असल्याचे वैद्य यांनी सांगितले. जे यात दोषी आढळतील त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. काही घटक समाजात जाणीवपूर्वक द्वेष आणि वैरभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांनी अशा शक्तींच्या सुप्त हेतूंना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा